सोलापूर, 09 ऑगस्ट : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक आणि धुळे ही शहरं वगळता इतर ठिकणी कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. आतापर्यंत शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला कुठेतरी हिसंक वळण लागताना दिसत आहे. सोलापूरमध्ये आंदोलकांनी हिंसक पद्धतीने आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. नवीपेठीतील व्यापरी असोशिएशन अध्यक्षांच्या दुकानाच्या काचा फोडल्या आंदोलकांकडून फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरात आता तणावपूर्ण शांतता पहायला मिळतेय. सर्व दुकांनाच्या काचा फोडल्याने नवीपेठ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर न जाण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा घटवास्थळी दाखल झाला आहे. आंदोलकांना पांगवण्याचं आणि हिंसा न करण्याचं पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे.