मराठा आरक्षणासाठी आंदोलकाने अंगावर रॉकेल ओतून घेतलं पेटवून

मराठा आरक्षणासाठी आंदोलकाने अंगावर रॉकेल ओतून घेतलं पेटवून

सोलापूरच्या माढ्यात मराठा आंदोलकाने रॉकेल अंगावर ओतून घेऊन पेटवुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.

  • Share this:

सोलापूर, 28 जुलै : सोलापूरात मराठा आरक्षणासाठी आणखी एक गंभीर प्रकार घडला आहे. सोलापूरच्या माढ्यात मराठा आंदोलकाने रॉकेल अंगावर ओतून घेऊन पेटवुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. माढा शहरात रास्तारोको सुरू असतानाच त्याने आत्महत्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. तानाजी नरसिंह पाटील असे आंदोलकर्त्याचे नाव आहे. सोलापूरमध्येही आंदोलना हिंसक वळण लागलं आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यातील माढा-वैराग मार्ग हा आज सकाळी पुन्हा एकदा आंदोलकांनी रोखून घरला होता. माठा तालुक्यातील दारफळ गावच्या तरुणांनी पहाटे 5 वाजल्यापासुन चक्का जाम आंदोलनाला सुरूवात केली होती. जाळपोळ करत आंदोलकांनी रस्तारोको केला आहे. रस्त्यावर टायर टाळून आणि झाडांच्या फांदा टाकत त्यांनी आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला. या तीव्र आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

मराठा आरक्षणासाठी राज्यभर पेटलेला वनवा काही विझण्याचं नाव घेत नाही आहे. कारण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूरमध्ये एका तरूणाने भीमा नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पण स्थानिक लोकांच्या मदतीने त्याला तात्काळ बाहेर काढण्यात आलं. सध्या त्याच्यावर पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कमी पावसाचामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह तसा कमी होता आणि त्यात स्थानिकांनी त्याला वाचवण्यासाठी लगेच धाव घेतल्या थोडक्यात त्याचा जीव बचावला आहे.

संबंधित बातम्या...

मराठ्यांना आरक्षण द्या, घटनादुरुस्तीसाठी आमचा पाठिंबा - शरद पवार

मराठा आरक्षण : पुन्हा एका आंदोलकाने घेतली नदीत उडी

मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटीलांनी मराठा आंदोलनात तेल ओतलं - शरद पवार

आज आरक्षणाच्या चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2018 12:13 PM IST

ताज्या बातम्या