S M L

मराठा आरक्षण : पुन्हा एका आंदोलकाने घेतली नदीत उडी

पंढरपूरमध्ये एका तरूणाने भीमा नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

Updated On: Jul 28, 2018 11:58 AM IST

मराठा आरक्षण : पुन्हा एका आंदोलकाने घेतली नदीत उडी

पंढरपूर, 28 जुलै : मराठा आरक्षणासाठी राज्यभर पेटलेला वनवा काही विझण्याचं नाव घेत नाही आहे. कारण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूरमध्ये एका तरूणाने भीमा नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पण स्थानिक लोकांच्या मदतीने त्याला तात्काळ बाहेर काढण्यात आलं. सध्या त्याच्यावर पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कमी पावसाचामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह तसा कमी होता आणि त्यात स्थानिकांनी त्याला वाचवण्यासाठी लगेच धाव घेतल्या थोडक्यात त्याचा जीव बचावला आहे.

मराठ्यांना आरक्षण द्या, घटनादुरुस्तीसाठी आमचा पाठिंबा - शरद पवार

तर पंढरपूरप्रमाणे सोलापूरमध्येही आंदोलना हिंसक वळण लागलं आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यातील माढा-वैराग मार्ग हा आज सकाळी पुन्हा एकदा आंदोलकांनी रोखून घरला होता. माठा तालुक्यातील दारफळ गावच्या तरुणांनी पहाटे 5 वाजल्यापासुन चक्का जाम आंदोलनाला सुरूवात केली होती. जाळपोळ करत आंदोलकांनी रस्तारोको केला आहे. रस्त्यावर टायर टाळून आणि झाडांच्या फांदा टाकत त्यांनी आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला. या तीव्र आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटीलांनी मराठा आंदोलनात तेल ओतलं - शरद पवार

तर आता सोलापूरात आणखी एक गंभीर प्रकार घडला आहे. सोलापूरच्या माढ्यात मराठा आंदोलकाने रॉकेल अंगावर ओतून घेऊन पेटवुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. माढा शहरात रास्तारोको सुरू असतानाच त्याने आत्महत्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. तानाजी नरसिंह पाटील असे आंदोलकर्त्याचे नाव आहे.

Loading...
Loading...

हेही वाचा...

नागपुरात साईंच्या चरणी दीड किलो सोन्याचा हार अर्पण

PHOTOS : एकीकडे दगडफेक,तोडफोड तर दुसरीकडे वर्दीतली आई !

VIDEO : सोलापूरात मराठा आंदोलन पेटलं, टायर जाळून केला चक्का जाम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 28, 2018 11:58 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close