Home /News /news /

एकीकडे मराठा मोर्चा समन्वयकांची तर दुसरीकडे भाजप आमदारांची आरक्षणावर बैठक

एकीकडे मराठा मोर्चा समन्वयकांची तर दुसरीकडे भाजप आमदारांची आरक्षणावर बैठक

मराठा मोर्चा समन्वयकांची आज परळीत महत्वाची बैठक होतेय. सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार.

    मुंबई, 02 ऑगस्ट : मराठा मोर्चा समन्वयकांची आज परळीत महत्वाची बैठक होतेय. सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार. या बैठकीला राज्यभरातले समन्वयक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात काही महत्वाची घोषणाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंदोलनला हिंसक वळण लागल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान भाजपनेही आज मुंबईत आपल्या सर्व आमदारांची मराठा आरक्षणासंबंधी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. या दोन्ही बैठकीत नेमकं काय ठरतंय यावरच मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी कालही काही ठिकाणी जाळपोळ आणि चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी चक्का जाम आंदोलन केलं. तर नांदेडमधील अर्धापूर तालुक्यात मेंढला गावाजवळ आंदोलकांनी महामार्गावर रास्तारोको करत एक ऑटो रिक्षा पेटवली. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. तर मालेगावमधील शिवाजी चौकात आंदोलकांनी जेलभरो आंदोलन केलं. लातूरमध्येही आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटिल निलंगेकर यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. सध्या संभाजी पाटिल निलंगेकरांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. मराठा आंदोलनात आतापर्यंत पाच जणांना आत्महत्या करून जीवन यांत्रा संपवली. औरंगाबादमध्ये कायगाव टोका इथं काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी टाकून आत्महत्या केल्या होती. काकासाहेब शिंदे यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात ठिकठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. या बंदला चाकण, नांदेड, नवी मुंबईत हिंसक वळण मिळाले होते. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची मुंबईत मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजासाठी अनेक घोषणा जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा संघटना सरकारी योजना अंमलबजावणी यासाठी जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली समिती केली जाणार आहे. यात मराठा संघटना पदाधिकारी समवेत प्रशासकीय अधिकारी असतील. यापुढे मराठा युवकांना बँकांकडून दहा लाख कर्ज घेताना राज्य सरकार बॅक गॅरिंटी देईल असा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुंबईत झाली. उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सदस्य विनोद तावडे, एकनाथ शिंदे, सदानंद मोरे आणि संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित होते. राज्य सरकारच्या मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीत घेतलेले निर्णय - मराठा समाजाासाठी योजनांची अंमलबजावणीसाठी आता २० जणांची जिल्हा निहाय समिती जिल्हाधिकारी अध्यक्ष खाली समिती असेल, त्यात दहा अधिकारी तर उर्वरित दहा यात मराठा संघटना प्रतिनिधी असेल. ही समिती विद्यार्थी फी, वस्तिगृह, कर्ज याचा आढावा घेत राहील. - बँका दहा लाख कर्ज देताना गँरिटी देताना अडचण येते असे समोर आले, त्यामुळं बँकांनी आता कर्ज देताना कोलॅटरेल किंवा माॅडगेज मागायचे नाही, सरकार कर्जाची गॅरिन्टी राहील, मराठा समजातील मुलांना कर्ज घेताना अडचण येणार नाही. - प्रत्येक जिल्हयात सरकार वापरात नाही ती इमारत ताब्यात घेत हाॅस्टेल सुरू केले जातील. वस्तीगृह मिळालेच नाही त्यांना दहा हजार रूपये मदत विद्यार्थीना मिळेल. - पीएचडी करू पाहणारे विद्यार्थीना देशात अथवा परदेशात फेलोशिप मिळेल. - स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात केंद्र सुरू केले जाईल.
    First published:

    Tags: Aurangabad, Maratha reservation, Mumbai, Parbhani, Parbhani news, Protest, Thane, मराठा ठोक मोर्चा, मराठा मोर्चा

    पुढील बातम्या