आंदोलनाचा राग माझ्यावर का?, केलं ८६ लाखांचे नुकसान

आंदोलनाचा राग माझ्यावर का?, केलं ८६ लाखांचे नुकसान

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून १८ जुलैपासून राज्यात आंदोलन केलं जातंय.

  • Share this:

मुंबई, 26 जुलै : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून १८ जुलैपासून राज्यात आंदोलन केलं जातंय. या आंदोलनात एसटीला मोठी झळ बसलीय. या आंदोलनादरम्यान बुधवापर्यंत एकूण 248 एसटी बस गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आलीय. काल झालेल्या आंदोलनामुळे मुंबईसह राज्यातील एकूण 56 आगार हे पुर्ण बंद ठेवण्यात आले. एकूण २४८ एसटी बस गाड्या आंदोलनकर्त्यांनी फोडल्या असून यामध्ये 5 बस गाड्या जाळण्यात आल्या.

अकरावीची तिसरी यादीही लांबणीवर, विद्यार्थ्यांचे हाल

एसटी महामंडळाला आंदोलनाची सर्वात मोठी झळ ही औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या औरंगाबाद प्रदेशात बसली आहे. या भागांत आंदोलन अधिक तीव्र होतानाच अनेक बस गाडय़ांचे नुकसान करण्यात आले. तसचं आंदोलनाच्या काळात औरंगाबाद प्रदेशातील एसटीचे आतापर्यंत ३५ लाख रुपयांहून अधिक नुकसान झालंय.

माल वाहतूकदारांनी गेल्या 6 दिवसांपासून पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे राज्यातील कोट्यवधीची उलाढाल ठप्प झालीय. चक्काजाममुळे उद्योगधंद्यांनाही चांगलाच फटका बसलाय. अकोला, भुसावळ, जळगाव रेल्वे स्थानकावर तब्बल 12 हजार टन खतांचा साठा तसाच पडून आहे. त्यामुळे शेतीवरसुद्धा याचा परिणाम होतोय.

नवी मुंबईत जनजीवन सुरळीत पण सुरक्षेसाठी इंटरनेट सेवा बंद

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून दररोज किमान ६०० ट्रक साखर देशभरात पाठवली जाते; ती ठप्प होऊन २०० कोटींची उलाढाल थांबली आहे. भाजीपाला, कांदा-बटाटे, गॅस सिलिंडर, धान्य, पेट्रोल, डिझेल यांवर विपरीत परिणाम झाला आहे.

हेही वाचा...

'चलो अयोध्या, चलो वारणसी', शिवसेनेची होर्डिंगबाजी

पाकिस्तानात सगळ्यात मोठी पार्टी ठरली इम्रान खानची 'तेहरीक-ए-इन्साफ'

'मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागावी'

First published: July 26, 2018, 9:51 AM IST

ताज्या बातम्या