मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मराठा आरक्षणासाठी पंढरपूरमध्ये 4 एसटी बस फोडल्या, एसटी वाहतूक बंद

मराठा आरक्षणासाठी पंढरपूरमध्ये 4 एसटी बस फोडल्या, एसटी वाहतूक बंद

काल मध्यरात्री आंदोलकांनी 4 बसेसवर दगडफेक केली आहे तर 1 बस जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

काल मध्यरात्री आंदोलकांनी 4 बसेसवर दगडफेक केली आहे तर 1 बस जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

काल मध्यरात्री आंदोलकांनी 4 बसेसवर दगडफेक केली आहे तर 1 बस जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

    पंढरपूर, 30 जुलै : मराठा आरक्षणासाठी पेटलेला वणवा अजूनही धुमसत आहे. पंढरपूरमध्ये आंदोलकांनी आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला आहे. काल मध्यरात्री आंदोलकांनी 4 बसेसवर दगडफेक केली आहे तर 1 बस जाळण्याचा प्रयत्न केला आहे. आज तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि काल झालेली बसेसची तोडफोड पाहता परिवहन महामंडळाने आज बस वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बस स्थानकावर बसेस नसल्याने स्थानकावर शुकशुकाट पाहयला मिळतो. बसेस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. 27 दिवसांनंतर संपली मृत्यूशी झुंज, अंधेरी पूल दुर्घटनेतील मनोज मेहता यांचं निधन आजही मराठा आरक्षणासाठी सोलापूरमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सोलापूर शहर आणि जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सोलापुरातील रुपाभवानी मंदिरात काल दिवसभर जागरण गोंधळाचा कार्यक्रम करण्यात आला आणि त्यानंतर आज हा बंद ठेवण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर सोलापुरात ही बंदची हाक देण्यात आलीय. सोलापूर बंदला धनगर, मुस्लिम, दलित, लिंगायत समाजाने जाहीर पाठिंबा दिलाय. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समिती, नवी पेठ व्यापारी असोशिएशननेही पाठिंबा जाहीर केलाय. यावेळी दिवसभर जागरण गोंधळ करण्यात आले. तसेच सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांची बैठकही काल घेण्यात आली. दरम्यान आंदोलनाला कोणत्याही प्रकारचे हिंसक वळण देवू नये असं आवाहन आयोजकांनी केलंय. मात्र तरिही पोलीस प्रशासनाकडून सर्वप्रकारची काळजी घेण्यात येणार आहे. आरक्षणासाठी बैठकींचं सत्र, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांच्या आमदारांसोबत स्वतंत्र बैठका त्यामुळे काही केल्या आंदोलनांची धग काही कमी होताना दिसत नाही आहे. तर दुसरीकडे आंदोलनादरम्यान ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते ते गुन्हे मागे घेण्यात यावे नाहीतर येत्या 9 ऑगस्टला त्याविरोधात राज्यभर मोठं आंदोलन करण्याचा इशारा मराठा मोर्चा संघटनेनं दिला पण तरुणांवर दाखल करण्यात आलेले ३०७ सह सर्व प्रकारचे गुन्हे मागे घेण्यात येतील. मात्र, पोलिसांवरील हल्ले आणि जाळपोळींसारखे गुन्हे मागे घेतले जाणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जे व्हिडीओंमध्ये या सर्व गोष्टी करताना दिसत आहेत त्यांच्यावरील गु्न्हे कुठल्याही परिस्थितीत मागे घेण्यात येणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हेही वाचा... मराठा आरक्षणाची धग कायम, सोलापूरात आज बंदची हाक डीएमकेचे प्रमुख एम.करूणानिधी यांची प्रकृती अत्यवस्थ प्लास्टिक वेचणाऱ्याचा मुलगा झाला डॉक्टर, मोदींचेही जिंकले मन
    First published:

    Tags: Andolan, Latest, Maratha kranti morcha, Maratha reservation, Pandharpur, St bus, Todfod, आंदोलन, पंढरपूर, मराठा क्रांती मोर्चा, सोलापूर बंद

    पुढील बातम्या