आरक्षणाच्या आंदोलनांमुळे फडणवीस सरकारची आज अग्निपरीक्षा

आरक्षणाच्या आंदोलनांमुळे फडणवीस सरकारची आज अग्निपरीक्षा

आजचा दिवस आंदोलनाचा असणार आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आज मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं केली जाणार आहेत. तर धनगर समाज देखील भव्य मोर्चा काढणार आहे.

  • Share this:

मुंबई, 01 ऑगस्ट : आजचा दिवस आंदोलनाचा असणार आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आज मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं केली जाणार आहेत. तर धनगर समाज देखील भव्य मोर्चा काढणार आहे. धनगर समाजाला एसटी म्हणजेच अनुसूचित जमाती प्रवर्गाचं आरक्षण मिळावं, अशी त्यांची मागणी आहे. तर तिसरा मुद्दा आहे पुण्यातल्या कचरा प्रश्नाचा. आजपासून कचरा टाकू देणार नाही, अशा इशारा फुरसुंगीच्या ग्रामस्थांनी दिला आहे.

आजपासून मराठा मोर्चानं राज्यभर विविध आंदोलनं करण्याचा इशारा दिला आहे. त्यात आता धनगर समाजाला एसटी म्हणजेच अनुसुचित जमाती प्रवर्गाचं आरक्षण मिळावं ही मागणी जोर धरू लागली आहे. आज धनगर समाजही भव्य मोर्चा काढणार आहे. तर पुण्यातला कचराप्रश्नही पुन्हा पेटतो की काय, असा प्रश्न निर्माण झालाय. कारण आजपासून पुण्यातला कचरा फुरसुंगीमध्ये टाकू देणार नाही, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महापालिकेसाठी आज मतदान

सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देऊ अशी घोषणा फडणवीस यांनी केली होती. पण 250 कॅबिनेट बैठका झाल्या पण एकाही बैठकीत धनगर मधला ध ही काढला नाही. टाटा सोशल सायन्सेस इन्स्टिट्यूटकडे अहवाल बनवण्याची जबाबदारी देणं म्हणजे वेळकाढूपणा आहे असं म्हंटलय धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी. आता ४ वर्ष वाट पाहिली आहे, सहनशीलता संपली असून आरक्षणासाठी एल्गार रणशिंग फुंकणार आहे असही शेंडगे यांनी म्हंटलय.

मुंबईत बांगलादेशी नागरिकांना शोधणं शक्य आहे का?

Loading...

एकीकडे हे सगळं असताना दुसरीकडे सांगली मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. दोन्ही महानगरपालिकेच्या एकूण 153 जागांसाठी 754 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकांमध्येही भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे एकीकडे आंदोलनांचा भडीमार आणि दुसरीकडे निवडणुकांमुळे फडणवीस सरकारची आज अग्निपरीक्षा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

हेही वाचा...

घर बसल्या केले हे व्यायाम तर नाही करणार कंबर आणि पाठदुखीची तक्रार

आज या राशीच्या लोकांना कळतील त्यांच्या पार्टनरचे सिक्रेट्स

हे काय भलतं चॅलेंज?, लोकं धावत्या गाडीतून उतरून नाचताय!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2018 09:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...