Home /News /news /

माओवाद्यांनी उपसरपंचाला घरातून नेलं उचलून, दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह!

माओवाद्यांनी उपसरपंचाला घरातून नेलं उचलून, दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह!

आज सकाळी गावकऱ्यांना हिरालाल यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाशेजारी माओवाद्यांनी पत्रकही टाकले होते.

गडचिरोली, 30 मार्च : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीतही गडचिरोलीमध्ये माओवाद्यांकडून कूट कारस्थानं सुरूच आहे. पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन माओवाद्यांनी माजी उपसरपंचाची हत्या केल्याची घटना घडली आहे. हिरालाल रामसाय कल्लो( वय 40) असं मृत इसमाचं नाव असून, ते नवेझरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच होते. मध्यरात्री  काही माओवादी गावात आले होते. त्यांनी हिरालालला गावाबाहेर नेऊन त्याची हत्या केली. हेही वाचा -तू प्लीज घरी ये, पत्नीनं नकार म्हणून लॉकडाऊनमध्ये तरुणानं केली आत्महत्या आज सकाळी गावकऱ्यांना हिरालाल यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाशेजारी माओवाद्यांनी पत्रकही टाकले होते. त्यात हिरालाल पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप माओवाद्यांनी  केला आहे.  हे कृत्य कोरची दलमने केल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. भुसुरुंग स्फोट घडवून पोलिसांच्या वाहनांवर बेछुट गोळीबार दरम्यान, मागील आठवड्यात माओवाद्यांचा पोलीस दलावर हल्ला केला होता. भुसुरुंग स्फोट घडवून पोलिसांच्या वाहनांवर बेछुट गोळीबार केला होता. पण सतर्कतेने माओवाद्याच्या हल्ल्यायातून गडचिरोली पोलीस दलाचे जवान बचावले. हेडरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोडमेटा जंगलात माओवाद्यांनी अभियान राबवणाऱ्या जवानांवर भुसुरुंग स्फोट घडवून हल्ला केला होता. हेही वाचा -पुण्याच्या सफाई कर्मचाऱ्याच्या लेकरांचे हाल, 3 महिने वेतन नसल्याने होतेय उपासमार माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्याला जवानांनी जोरदार प्रतिउत्तर देत हल्ला परतावून लावला. वाढत्या दबावाने माओवादी पळून गेले. नंतर जंगलात शोध मोहीम जवानांनी राबवल्यावर तिथं आणखी स्फोटकं पेरलेली आढळली होती. हल्ला करण्यासाठी 40 पेक्षा जास्त माओवादी उपस्थित होते. माञ, जवानाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Gadchiroli

पुढील बातम्या