राष्ट्रवादीत आऊटगोईंग बंद इनकमिंग सुरू, अनेकांनी धरला पवारांचा हात!

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले इथे आज अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला आहे. जेष्ठ नेते मधुकर पिचड यांचा मतदारसंघात असलेल्या अकोलेत आज अजित पवारांची तोफ धडाडणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2019 12:34 PM IST

राष्ट्रवादीत आऊटगोईंग बंद इनकमिंग सुरू, अनेकांनी धरला पवारांचा हात!

शिर्डी, 23 सप्टेंबर : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी भाजपला अकोल्यामध्ये सगळ्यात मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत अनेकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. भाजप जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे, सुनीता भांगरे यासह अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये गेले आहेत. पिचड यांच्या विरोधात एकास एक लढत देण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी ही धोक्याची घंडा आहे.

मधुकर पिचड यांच्या भाजपा प्रवेशानंतर आज त्यांच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांची सभा होणार आहे. पिचडांच्या पराभवासाठी एकास एक उमेदवार देऊन ही लढाई होण्याची चिन्हं आहेत. आज अजित पवार यांच्या उपस्थितीत अकोले भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे आणी सुनिता भांगरे यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पिचडांसह भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले इथे आज अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला आहे. जेष्ठ नेते मधुकर पिचड यांचा मतदारसंघात असलेल्या अकोलेत आज अजित पवारांची तोफ धडाडणार आहे. पिचडांच्या भाजपा प्रवेशानंतर अजित पवार आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दरम्यान, या मेळाव्यात पिचडांचे पारंपारिक विरोधक असलेले अशोक भांगरे आणी जिल्हा परीषद सदस्य सुनिता भांगरे आणि भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत पिचडांच्या पराभवाचा निर्धार केला आहे.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून अनेक दिग्गज नेत्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे दोन्ही पक्षांचं पारडं आता जड आहे. जोरदार मेगाभरतीमुळे युतीच्या फॉर्म्युल्यात तिढा निर्माण झाला आहे. युतीची चर्चा अद्याप फायनल झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. भाजप शिवसेना जागावाटपाबद्दल आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या चर्चेच्या फेऱ्या संपल्या असून आता युतीच्या घोषणेसाठी घटस्थापनेचा मुहूर्त काढण्यात आली असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

इतर बातम्या - नारायण राणेंना पुन्हा धक्का, आजचा भाजप प्रवेश रद्द!

Loading...

शिवसेनेचा 50-50चा फॉर्म्युला हा भाजपला अद्याप अमान्यच आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा हा अद्याप कायम आहे. युती होणार हे 100 टक्के नक्की असलं तरी जागावाटपाबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना 126 जागांवर ठाम आहे तर भाजप 120 पैकी एकही जागा देण्यासाठी तयार नाही आहे. त्यामुळे शिवसेनेला कमी जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

इतर बामत्या - युतीच्या चर्चेवर भाजपचा हट्टीपणा कायम, शिवसेनेचा 'हा' फॉर्म्युला अमान्यच!

लोकसभेमध्ये युतीसाठी 50-50 फॉर्म्युला वापरण्यात आला होता तोच विधानसभेवेळीही वापरण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि सेनेमध्ये जोरदार इनकमिंग झालं. त्यामुळे दोन्ही पक्षांचं पारडं जड आहे. असं असताना 50-50च्या फॉर्म्युल्याने दोन्ही पक्षांना अडचणी येतील. तर मोठा पक्ष म्हणून भाजप 120 जागेच्या वर एकही जागा शिवसेनेला देण्यासाठी तयार नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commision of India) पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. राज्यात ऑक्टोबर 2014 विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर निकाल 19 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले होते.

288 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

अधिसूचना - 27 सप्टेंबर

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख - 4 ऑक्टोबर

उमेदवारी अर्ज छाननी - 5 ऑक्टोबर

उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख - 7 ऑक्टोबर

2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात कुणाला किती जागा?

इतर बातम्या - रत्नागिरी: राष्ट्रवादी शिवसेनेला करणार 'चेकमेट'; रिंगणात आणणार तगडा उमेदवार

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

इतर बातम्या - 'पुतण्याला बक्षिस देण्यासाठी शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंचं घर फोडलं'

काय आहे हरियाणातील स्थिती?

हरियाणामध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. हरियाणात मागील निवडणुकीत 90 पैकी 47 जागांवर भाजपने विजय मिळवला होता आणि मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar)यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते.

VIDEO: कामाला लागा, डेंग्यूच करण चालणार नाही! अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 12:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...