'वारसा पुढे चालवणार!' मनोहर पर्रिकरांच्या मुलांचे राजकीय एण्ट्रीचे संकेत

'वारसा पुढे चालवणार!' मनोहर पर्रिकरांच्या मुलांचे राजकीय एण्ट्रीचे संकेत

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या दोन्ही मुलांनी राजकीय प्रवेशाचे संकेत दिले आहेत.

  • Share this:

पणजी, 30 मार्च : गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या दोन्ही मुलांनी राजकीय प्रवेशाचे संकेत दिले आहेत. 'राज्य आणि देशाप्रति वडिलांनी ज्या पद्धतीनं निष्ठा आणि बांधिलकी जपली, त्यांचा हाच वारसा आम्ही पुढे चालवणार', असे पर्रिकर यांचे पुत्र उत्पल आणि अभिजात यांनी शनिवारी (30 मार्च)म्हटलं. मनोहर पर्रिकर यांचे 17 मार्च रोजी निधन झाले. जवळपास वर्षभरापासून ते स्वादुपिंडाच्या कर्करोगानं त्रस्त होते. अखेर त्यांची आजाराविरोधातली झुंज 17 मार्चला संपली. पर्रिकर यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र उत्पल आणि अभिजात लोकसभा निवडणूक 2019 किंवा पर्रिकरांच्या रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघातून आपल्या राजकीय कारर्कीदीला सुरुवात करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पर्रिकरांच्या मुलांनी कृतज्ञता संदेशात म्हटलं की, "राज्य आणि देशाप्रति वडिलांची ज्या प्रकारे निष्ठा आणि बांधिलकी होती, त्याचा वारसा आम्ही पुढे चालवू. हीच आमच्याकडून त्यांना श्रद्धांजली असेल. आमच्या वडिलांनी प्रत्येक दिवस उत्साहात, बळकट इच्छाशक्ती आणि देश सेवा करण्याच्या स्वप्नासहीत जगला आहे. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी राज्याची सेवा केली आहे. वडिलांच्या जाण्यानं कुटुंबात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. पण दुसरीकडे, जनतेकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे आम्हाला असं जाणवत आहे की ते (मनोहर पर्रिकर) आमच्यासाठी प्रचंड मोठा परिवार सोडून गेले आहेत''. दरम्यान, योग्य वेळी राजकारणात येण्याचा निर्णय घेऊ, असं विधान काही दिवसांपूर्वी उत्पल यांनी केलं होतं.

वाचा अन्य बातम्या

निवडणूक लढण्यासाठी कन्हैयाकुमारने असा जमवला चंदा

'CRPFचे 40 जवान शहीद झालेत त्यावरही मला शंका आहे', फारूख अब्दुल्लाचं वादग्रस्त विधान

पाकिस्तानचा कट्टर दुश्मन आहे हा देश, नागरिकांना जायलाही आहे बंदी

VIDEO: 'आपला पंतप्रधान कोण?' उद्धव ठाकरे म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2019 10:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading