नोटबंदी ही तर देशाची संघटीत लूट - मनमोहन सिंग

नोटबंदी ही तर देशाची संघटीत लूट - मनमोहन सिंग

मोदी सरकारनं नोटबंदी करून देशाची संघटीत लूट केल्याचा घणाघात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलाय. गुजरात विधानसभेच्या प्रचारासाठी मनमोहन सिंग यांनी आज गुजरातमध्ये जाहीर भाषण केलं. या भाषणादरम्यान, मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर देशाच्या बिकट आर्थिक परिस्थितीवरून जाहीरपणे हल्लाबोल चढवला.

  • Share this:

अहमदाबाद, 07 नोव्हेंबर : मोदी सरकारनं नोटबंदी करून देशाची संघटीत लूट केल्याचा घणाघात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलाय. गुजरात विधानसभेच्या प्रचारासाठी मनमोहन सिंग यांनी आज गुजरातमध्ये जाहीर भाषण केलं. या भाषणादरम्यान, मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर देशाच्या बिकट आर्थिक परिस्थितीवरून जाहीरपणे हल्लाबोल चढवला.

नोटबंदीतून काही साध्य तर झालंच नाही उलट देशाचं मोठं आर्थिक नुकसान झालं. छोट्या उद्योजक आणि व्यापारी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडले, रोजगार निर्मितीही थंडावली त्यामुळे नोटबंदी ही सर्वातमोठी चूक असल्याचं मनमोहन सिंग यांनी म्हटलंय. नोटबंदीच्या माध्यमातून 90 टक्के काळा पैसा परत पांढरा होऊन व्यवस्थेत आला त्यामुळे नोटबंदी ही देशाची एकप्रकारची संघटीत लूटच आहे, असंही मनमोहन सिंग म्हणाले, आर्थिक विकासदरातली 1 टक्का घसरणही अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम करते, इथंतर देशाचा जीडीपी साडे टक्क्यांवरून थेट साडेपाच टक्क्यांवरून घसरलाय. त्यामुळे नोटबंदीने देशाच्या अर्थव्यवस्थेचं खूप मोठं नुकसान झालंय.

जीएसटीमध्येही सरकारने एकसूत्रता न ठेवल्याने छोट्या गुंतवणूकदारांसाठी हे एक दुःखद स्वप्नच बनून गेल्याचं माजी पंतप्रधानांनी म्हटलंय. नोटबंदी आणि जीएसटीमुळे छोट्या गुंतवणूदारांचं कंबरडं मोडल्यामुळे काँग्रेस नोटबंदीचा 8 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळणार असल्याचंही मनमोहन सिंग यांनी म्हटलंय.

गुजराती व्यापाऱ्यांमध्ये नोटबंदी आणि जीएसटीवरून प्रचंड नाराजी आहे. म्हणूनच काँग्रेसने विधानसभा प्रचारासाठी थेट मनमोहन सिंग यांचं उतरवलं आहे. अर्थात याचा काँग्रेसला कितपत फायदा होतो हे विधानसभा निकालानंतरच कळेल.

First published: November 7, 2017, 1:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading