11 डिसेंबर, नवी दिल्ली : ''गुजरातच्या निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्यानेच पंतप्रधान मोदी आमच्यावर पाकिस्तानशी बैठका घेतल्याचे खोटे आरोप करताहेत,''असा घणाघात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलाय. मोदींच्या आरोपांमुळे मी दुखावलो गेलो असून यांच्या या विधानाचा मला रागही आला आहे. माजी पंतप्रधान आणि लष्कर प्रमुखांवर अशी टीका करुन मोदी घटनात्मक संस्थांवर टीका करत चुकीचा पायंडा पाडत आहेत, असंही मनमोहन सिंग यांनी म्हटलंय.
मोदी सारख्या धादांत खोटं बोलणाऱ्या लोकांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये, आमच्या पक्षाला स्वातंत्र्य लढ्याचा दैदिप्यमान इतिहास आहे. तसंच आमच्यावर पाकिस्तानशी संधान बांधल्याचा आरोप करणारे मोदी स्वत: मात्र, गुरुदासपूर आणि उधमपूरला अतिरेकी हल्ले झाल्यानंतर पाकिस्तानला गेले होते आणि त्यांनी पठाणकोटच्या हवाई दलाच्या तळावर हल्ला झाल्यानंतर त्याच्या चौकशीसाठी आयएसआयच्या लोकांना आमंत्रण दिलं. याची आठवणही मनमोहन सिंग यांनी आरोपाच्या निमित्ताने करून दिलीय. या खोट्या आरोपांबद्दल पंतप्रधान मोदी देशाची माफी मागतील, अशी मी अपेक्षा बाळगतो. मी किंवा ज्यांची नावं घेतली गेली आहेत त्यांनी कधीच पाकिस्तानी लोकांशी गुजरात निवडणुकीबद्दल चर्चा केलेली नाही. एवढंच यानिमित्ताने मला सांगायचं आहे,
काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्याधरी पाकिस्तानी उच्चायुक्तांसोबत झालेल्या बैठकीत गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी अहमद पटेल यांना बसवण्यासंबंधी चर्चा झाल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केलाय. या बैठकीला स्वतः मनमोहन सिंग आणि तत्कालीन लष्करप्रमुख उपस्थित होते. त्यांनीही मोदी खोटं बोलत असल्याचं म्हटलंय. तसंच मोदी ज्या बैठकीबद्दल बोलताहेत ती मुळात बैठक नव्हतीच, ते एक साधं स्नेहभोजन होतं. असंही मनमोहन सिंग यांनी म्हटलंय.
Former Prime Minister Manmohan Singh issues a statement after reports of him attending a meeting where a Pakistan envoy was also present. pic.twitter.com/ngAyC7MW08
— ANI (@ANI) December 11, 2017