पंतप्रधानपदासाठी प्रणव मखर्जी अधिक योग्य उमेदवार होते- मनमोहन सिंह

पंतप्रधानपदासाठी प्रणव मखर्जी अधिक योग्य उमेदवार होते- मनमोहन सिंह

2004 साली युपीएचं सरकार आल्यानंतर खरंतर माझ्यापेक्षा प्रणव मुखर्जी अधिक योग्य उमेदवार होते, पण मॅडम सोनियाजींनी मला पंतप्रधानपदावर बसवलं, आणि माझ्यासमोरही दुसरा कोणताच पर्याय नव्हता, अशी प्रांजल कबुली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलीय. विशेष म्हणजे या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी आणि सोनिया गांधी हे दोन्ही नेते उपस्थित असताना मनमोहन सिंग यांनी हे विधान केलंय.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : 2004 साली युपीएचं सरकार आल्यानंतर खरंतर माझ्यापेक्षा प्रणव मुखर्जी अधिक योग्य उमेदवार होते, पण मॅडम सोनियाजींनी मला पंतप्रधानपदावर बसवलं, आणि माझ्यासमोरही दुसरा कोणताच पर्याय नव्हता, अशी प्रांजल कबुली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलीय. विशेष म्हणजे या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी आणि सोनिया गांधी हे दोन्ही नेते उपस्थित असताना मनमोहन सिंग यांनी हे विधान केलंय.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जीवनावर आधारित 'द कोलिशन इयर्स' या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी हे गुपित उघड केलंय. विशेष म्हणजे मनमोहन सिंह 2004सालचा हा प्रसंग सांगत असताना समोर बसलेल्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी देखील खळाळून हास्य करत दाद दिली. प्रणव मुखर्जी यांनीही माजी पंतप्रधानांच्या या प्रांजळ कबुलीला अगदी मनमोकळ्यापणाने दाद दिली.

मनमोहन सिंह पुढे म्हणाले, ''प्रवण मुखर्जी हे 'बाय चॉईस' राजकारणी होते तर मी अपघाताने राजकारणात आलोय, तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही नरसिंहराव यांनी अर्थमंत्रीपद सांभाळण्यासाठी बोलावल्यानंतरच मी राजकारणात आलो. पुढच्या काळात सोनिया गांधींनी मला पंतप्रधानपदी बसवलं तरीही माझ्यात आणि प्रणवदांमध्ये कधीच सिनिअर जुनिअर असा वाद निर्माण झाला नाही, उलटपक्षी युपीएचं सरकार सुरळीतपणे चालवण्यासाठी प्रणवदांनी अनेकदा संकटमोचकाची भूमिका अगदी लिलया पार पाडली. माझ्यासाठी प्रणवदा हे एक प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्व आहेत. देशाच्या राजकीय इतिहासात त्यांची नक्कीच चांगल्या अर्थाने नोंद घेतली जाईल''

नवी दिल्लीत रंगलेल्या या प्रणवदांच्या पुस्तक सोहळ्याला माकपनेते सीताराम येचुरी, भाकपनेते सुधाकर रेड्डी, सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

First published: October 14, 2017, 5:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading