Home /News /news /

Manmohan Singh Health Update: AIIMS च्या अधिकाऱ्यांनी मनमोहन सिंह यांच्या प्रकृतीसंदर्भातली दिली माहिती

Manmohan Singh Health Update: AIIMS च्या अधिकाऱ्यांनी मनमोहन सिंह यांच्या प्रकृतीसंदर्भातली दिली माहिती

Manmohan Singh Health Update: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह (Dr. Manmohan Singh) यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.

    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह (Dr. Manmohan Singh) यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. डॉ.मनमोहन सिंह यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं समजतंय. एम्सच्या (AIIMS)अधिकाऱ्यांनी शुक्रवारी या संदर्भातली माहिती दिली आहे. सिंह यांना बुधवारी ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेज (एम्स)मध्ये दाखल करण्यात आलं आहे. ताप आल्यानंतर अशक्तपणा आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी माजी पंतप्रधानांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली आहे. हेही वाचा- प्रेयसीला भेटण्यासाठी संपूर्ण गावाची करायचा बत्ती गूल; रंगेहाथ पकडून गावकऱ्यांनी केली भयंकर अवस्था अन् शेवटी...  ANI या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, एम्सच्या अधिकाऱ्यांनी सिंह यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं सांगितलं आहे. 89 वर्षीय काँग्रेस नेत्याला हॉस्पिटलच्या कार्डिओ-न्यूरो सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. येथे डॉ.नितीश नाईक यांच्या नेतृत्वाखालील टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मनमोहन सिंह यांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एम्स रुग्णालय गाठले. त्यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हे देखील माजी पंतप्रधानांच्या प्रकृतीविषयी माहिती घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते. यानंतर त्यांनी ट्विट केले होतं. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, आज माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांची एम्स, नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याची प्रकृती लवकरच स्थिर व्हावी अशी प्रार्थना करतो. हेही वाचा- ओ तेरी! ऋषभ पंतनं नवरात्रामध्ये दिल्या भलत्याच शुभेच्छा, फॅन्सनी केली जोरदार धुलाई  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवर सिंह यांच्या बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मोदींनी लिहिलं, मी डॉ. मनमोहन सिंह यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करतो. यापूर्वीही सिंह यांनी अनेक बायपास शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांच्यावर शेवटची शस्त्रक्रिया जानेवारी 2009 मध्ये झाली. याशिवाय काही महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची ही लागण झाली होती. 19 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यानंतर 29 एप्रिल रोजी त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. मनमोहन सिंग यांनी 4 मार्च आणि 3 एप्रिल रोजी कोरोनाच्या दोन्ही लशी घेतल्या होत्या. सध्या, सिंह राजस्थानचे राज्यसभा सदस्य आहेत. एप्रिल 2020 मध्ये त्यांना 11 सदस्यीय काँग्रेस टीमचं प्रमुख बनवण्यात आलं. 2004 ते 2014 पर्यंत त्यांनी 13 वे पंतप्रधान म्हणून देशाची सूत्रे हाती घेतली. या व्यतिरिक्त ते सातत्याने राजकीय विषयांवर प्रतिक्रिया देत आलेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Manmohan singh

    पुढील बातम्या