मंजुळा शेट्ये प्रकरणी चुकीची माहिती देणाऱ्या 'जेजे'तील डाॅक्टराचं निलंबन

या प्रकरणात चुकीची माहिती दिल्याचा ठपका या डाॅक्टरावर ठेवण्यात आलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2017 04:02 PM IST

मंजुळा शेट्ये प्रकरणी चुकीची माहिती देणाऱ्या 'जेजे'तील डाॅक्टराचं निलंबन

29 जुलै : मंजुळा शेट्ये मारहाण प्रकरणी जेजे रुग्णालयातील एका डॉक्टराला निलंबित करण्यात आलंय. या प्रकरणात चुकीची माहिती दिल्याचा ठपका या डाॅक्टरावर ठेवण्यात आलाय.

भायखळा जेलमध्ये मंजुळा शेट्ये या महिलेला ब्रेड आणि अंडीच्या हिशेबावरून जेल अधिकारी मनीषा पोखरकरसह बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणेने  यांनी तिला अमानुष मारहाण केली या मारहाणीत तिचा मृत्यू झाला होता. एवढंच नाहीतर  शीना बोरा हत्याप्रकरणातील दोषी इंद्राणी मुखर्जीने मंजुळा शेट्येला विवस्त्र करून मारहाण केली आणि गुप्तांग काठ्या घातल्यात असा गंभीर आरोप इंद्राणीने केला होता. तिच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली.  जेजे रुग्णालयाने मंजुळाचा शवविच्छेदनाचा अहवाल सादर केला त्यात तिच्या गुप्तांगाला जखमा झाल्या नसल्याचं म्हटलंय.

तसंच दोनच दिवसांपूर्वी मंजुळा कारागृहात चक्कर येऊन पडली होती त्यामुळे तिचा मृत्यू झाला असा अजब दावा पोलिसांनी कोर्टात केला होता. कोर्टाने या दाव्यावर पोलिसांचा चांगलाचं फटकारलं. काल विधानसभेतही राज्य सरकारने  मंजुळा शेट्येचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याची स्पष्ट कबुली दिली होती. या प्रकरणी  ज राज्य सरकारने जेजे हाॅस्पिटलमधील डाॅक्टराला चुकीची माहिती दिली म्हणून निलंबित करण्याचे आदेश दिले. राज्य सरकारच्या आदेशानंतर डाॅक्टराला निलंबित करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2017 04:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...