येवला,2 जानेवारी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे कट्टर विरोधक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव शिंदे यांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांच्या विरोधात काम केल्याचा ठपका माणिकराव शिंदे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवून पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी त्यांची हकालपट्टी केली आहे. याबाबत त्यांनी एक पत्र पाठवले आहे. माणिकराव शिंदे यांनी 2004 साली विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळांनी येवल्यातून निवडणूक लढविण्यास गळ घातली होती. शिंदे हे भुजबळांचे खंदे समर्थक मानले होते. मात्र, नुकतीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने शिंदे यांची मागणी फेटाळून भुजबळांनाच उमेदवारी दिली होती. त्यामुळे शिंदे नाराज झाले होती. त्यांनी भुजबळांच्या विरोधात भूमिका घेऊन प्रचार केला होता. याची दखल घेत अखेर गुरुवारी शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या उमेदवाराला दिला होता पाठिंबा...
विधानसभा निवडणुकीत माणिकराव शिंदे यांनी शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांना पाठिंबा दिला होता. माणिकराव शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली होती. दरम्यान, संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यात 3 जाहीर सभा घेतल्या होत्या. दरम्यान, भुजबळ यांनी त्यानंतर येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांवर लक्ष केंद्रीत केले होते. मतदारसंघातील अनेक विकास कामांचे लोकार्पणही केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.