'मणिकर्णिका'च्या निर्मात्यांना अर्धांगवायूचा झटका, रुग्णालयात उपचार सुरू

मणिकर्णिका' सिनेमाच्या निर्मितीआधी कमल जैन हे इरॉस इंटरनॅशनलचे सीएफओ होते. कंगना रणौतसह ते या सिनेमाची निर्मिती करत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jan 20, 2019 10:11 AM IST

'मणिकर्णिका'च्या निर्मात्यांना अर्धांगवायूचा झटका, रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई, २० जानेवारी २०१९- कंगना रणौतचा आगामी सिनेमा मणिकर्णिकाचे निर्माते कमल जैन यांना अर्धांगवायूचा झटका आला असून त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते सध्या व्हेंटिलेटरवर असून डॉक्टरांची तुकडी त्यांच्यावर उपचार करत आहेत.

येत्या २५ जानेवारीला मणिकर्णिका सिनेमा प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनापूर्वीपासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एकीकडे करणी सेनेकडून सिनेमाला कडाडून विरोध केला जात आहे तर दुसरीकडे सिनेमाच्या निर्मात्यांची तब्येत ठीक नाही.

कमल जैन यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांची तब्येत खराब असल्याची आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं ट्विट करण्यात आलं. मात्र त्यांची तब्येत एवढी बिघडेल याचा अंदाज कोणालाच नव्हता.Loading...


'मणिकर्णिका' सिनेमाच्या निर्मितीआधी कमल जैन हे इरॉस इंटरनॅशनलचे सीएफओ होते. कंगना रणौतसह ते या सिनेमाची निर्मिती करत आहेत.

Special Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2019 10:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...