आलिया भट्टवर कंगनाने केले असे आरोप की रणबीर कपूरलाही येईल राग

आलिया भट्टवर कंगनाने केले असे आरोप की रणबीर कपूरलाही येईल राग

त्यांच्या मदतीला आपण गेलो तरी आपली ते मदत करतीलच असं ठामपणे सांगता येत नाही.

  • Share this:

मुंबई, ०५ फेब्रुवारी २०१९- 'मणिकर्णिका' सिनेमाच्या विवादानंतर आता कंगनाने बॉलिवूडवर नवीन आरोप केला आहे. कंगना म्हणाली की बॉलिवूडमध्ये फार संधीसाधू लोक आहेत. त्यांच्या मदतीला आपण गेलो तरी आपली ते मदत करतीलच असं ठामपणे सांगता येत नाही.

कंगना म्हणाली की, ‘२०१४ मध्ये क्वीन सिनेमाच्या यशानंतर सगळे फँटमचं कौतुक करत होते. विकास बहल त्याच्या मित्र- मैत्रिणींसाठी एकामागोमाग एक स्क्रिनिंग ठेवत होता. सिनेसृष्टीतील त्याचे अनेक मित्र सिनेमा पाहायला येत होते. मीही तिकडे होते. पण जाणूनबूजून मला दुर्लक्षित केलं जायचं.’

पिंकविला वेबसाइटशी बोलताना कंगना म्हणाली की, ‘तनु वेड्स मनु सिनेमानंतर मीही इतर कलाकारांसाठी स्क्रिनिंग ठेवलं होतं. ‘त्यांच्यापैकी’ कोणीच यायचं नाही. पण, जेव्हा त्यांच्या सिनेमाचं स्क्रिनिंग असेल तेव्हा निर्लजपणे मला बोलवायचे. मी अनेकदा प्रिव्ह्यूला जाण्यासाठी शूटिंग रद्द केली आहेत.’

आलियाचा राझी सिनेमाचा ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा तिने मला मेसेज करून तो ट्रेलर पाहायला सांगितला होता. माझ्यासाठी 'राझी' हा आलियाचा किंवा करण जोहरचा सिनेमा नव्हता. तो सेहमत खानचा सिनेमा होता. सिनेमा पाहून झाल्यावर मी आलियाला आणि मेघना गुलझारला फोन केला. दोघींशी अर्धा तास बोलले. पण त्यांच्याकडून मला कधीच उत्तर मिळालं नाही. सिनेसृष्टीत हे कसलं रॅकेट सुरू आहे तेच मला कधी कळलं नाही.

मणिकर्णिका सिनेमाच्यावेळी एकाही अभिनेत्रीने माझं समर्थन केलं नाही किंवा सिनेमा चांगला वाटला की वाईट याबद्दल सांगितलं नाही. आता माझ्या त्यांच्याकडून फार अपेक्षाही नाहीत.

आमिर खानचा 'दंगल' आणि 'सुपरस्टार' सिनेमा पाहण्यासाठी गेले होते. पण त्यांना माझ्या सिनेमाचा ट्रेलर पाहायला किंवा सिनेमा पाहायला वेळच नसतो. येत्या काळात माझे अजून काही सिनेमे प्रदर्शित होत आहेत. माझ्या सिनेमांबद्दल ते लिहितील अशी आता माझी कोणतीही अपेक्षा नाही. ते कोणत्या गोष्टीला घाबरतात तेच मला माहीत नाही.

VIDEO : काँग्रेसमध्ये दाखल होताच शिल्पा शिंदेची मनसेवर टीका, UNCUT पत्रकार परिषद

First published: February 5, 2019, 5:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading