S M L

VIDEO : पंतप्रधान मोदींच्या फिटनेस चॅलेंजला 'या' टेनिस स्टारने दिलं असं उत्तर...

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2018 11:02 PM IST

VIDEO : पंतप्रधान मोदींच्या फिटनेस चॅलेंजला 'या' टेनिस स्टारने दिलं असं उत्तर...

अद्वैत मेहता,पुणे

13 जून : भारताचं टेबल टेनिस सेन्सेशन मनिका बात्राने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं फिटनेस चॅलेंज स्वीकारून पुण्यात योगा करून सूर्यनमस्कार घालून आपण फिट असल्याचं दाखवलं.

पंतप्रधान मोदींनी ट्विट करून आपल्याला आव्हान दिले ही लवकरच येणाऱ्या वाढदिवसाची गिफ्ट असल्याचं मनिकाने न्यूज 18 लोकमतला सांगितलं. कॉमनवेल्थमध्ये सुवर्ण पदक मिळवल्या नंतर आता लक्ष्य आॅलिम्पिक असल्याचंही ती म्हणाली.विराट कोहलीने खुद्द पंतप्रधान मोदींना फिटनेस चॅलेंज दिलं होतं. मोदींनी योगा करून ते स्वीकारलं आणि कुमारस्वामी,मनिका आणि 40 वयाच्या वरच्या अधिकाऱ्यांना चॅलेंज दिलं.

मोदींचं ट्विट व्हिडिओ आज सकाळपासून व्हायरल झाला आणि आम्ही पुण्यात आलेल्या मनिकाला गाठलं. मनिकाने योगा, सूर्यनमस्कार करून आव्हान पुरे केलं आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.

कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक तसंच इतर अनेक स्पर्धात मेडल्स मिळवल्यानंतर आता अर्थातच आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण हे लक्ष्य असल्याचं तिनं सांगितलं. कुटुंब आणि कोच यांनाही ती यशाचे श्रेय देते.

VIDEO : मोदींनी पूर्ण केलं फिटनेस चॅलेंज, पहा हा व्हिडिओ

खेळमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी 'फिट है इंडिया' हे चॅलेंज सुरू केलं आणि आता त्यात चित्रपट,सिनेमा क्षेत्रातील दिगग्ज सहभागी होत आहेत. यातून तरुणपिढीला प्रेरणा मिळतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2018 11:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close