Home /News /news /

Pune : दान करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी लांबवले भाजी विकणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र, घटना सीसीटीव्हीत कैद

Pune : दान करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी लांबवले भाजी विकणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र, घटना सीसीटीव्हीत कैद

pune junnar crime News मला दान कराच्या वस्तू पिशवीमध्ये आहेत. मी जे दान करणार आहे त्या पिशवीत तुम्ही तुमचे गळ्यातले दागिने काढुन ठेवा, असं त्यानं सांगितलं.

जुन्नर, 20 मे : जुन्नरमध्ये (Junnar) दान करण्याच्या बहाण्याने दोन भामट्यांनी भाजी विक्रेत्या महिलेला (Vegetable seller Woman) गंडा घातला. तिची फसवणूक करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र (Mangalsutra) या भामट्यांनी लपास केलं. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्हीमध्ये (CCTV) हा प्रकार कैद झाला आहे. फुटेजच्या आधारे आता पोलिस तपास करत आहे. मात्र अतिशय वेगळ्या पद्धतीनं चोरट्यांनी ही चोरी केल्याचं पाहायला मिळालं आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावर राजुरी येथील चावडी समोर हौसाबाई घंगाळे या भाजी विक्री करतात. नेहमीप्रमाणे त्या गावच्या चावडीसमोर टपरीमध्ये भाजी विक्रीसाठी बसल्या होत्या. त्यावेळी एका पांढऱ्या दुचाकीवरून दोन तरुण भाजी खरेदीच्या बहाण्याने त्यांच्याकडे आले. भाजी खरेदी करताना मोटारसायकलवर मागे बसलेला तरुण त्यांच्याशी बोलू लागला. माझी आई आजारी आहे. मला तिच्यासाठी पाच हजारांच्या वस्तू दान करायच्या आहेत. पिशवित त्या वस्तू आणल्याचं सांगत त्यांनी ती पिशवी त्या आजींसमोर ठेवली. (वाचा-Jalna News : DYSP सह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना 2 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं) मला दान कराच्या वस्तू पिशवीमध्ये आहेत. मी जे दान करणार आहे त्या पिशवीत तुम्ही तुमचे गळ्यातले दागिने काढुन ठेवा. आम्ही गेल्यावर त्या पिशवीतले दागिने आणि इतर वस्तू काढून घ्या, असं त्यानं त्यांना सांगितलं. आजी त्यांच्या बोलण्याने फसली आणि त्यांनी गळ्यातलं गंठण काढून पिशवीत ठेवलं. तरुणानं पिशवीला गाठ मारली. त्यानंतर पिशवी आजीला देऊन ते दोघं निघून गेले. नंतर आजीनी पिशवीची गाठ उघडली तर त्यात एक नारळ, दोन बिस्किट पुडे आणि तीन दगडाचे तुकडे निघाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आजींनी आरडाओरड केला. पण दोन्ही भामटे मोटारसायकलवरुन पसार झाले. (वाचा-पती आणि मुलांसोबत झोपलेल्या महिलेवर बलात्कार, एका गैरसमजामुळे घडलं भलतंच) याप्रकणी आळेफाटा पोलीस ठाण्यात दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राजुरी चावडीसमोर हा सगळा प्रकार घडला. त्यामुळं मंगळसूत्र चोरीचा प्रकार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आळेफाटा पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतलं असून या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. चोरांनी चोरीसाठी अवलंबलेल्या पद्धतीनं मात्र सगळेच आवाक झालेत.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Crime news, Pune, Thief

पुढील बातम्या