धक्कादायक! दादा आणि वहिणी मतदानासाठी गेले असता घरात तरुणीने लावला गळफास

धक्कादायक! दादा आणि वहिणी मतदानासाठी गेले असता घरात तरुणीने लावला गळफास

लोकसभा निवडणुका असल्यामुळे घरातील दादा आणि वहिणी मतदान करण्यासाठी गेले होते. त्यावेळी घरात कोणीही नाही हे लक्षात घेत तरुणीने गळफास लावून घेतला.

  • Share this:

हिमाचल प्रदेश, 19 मे : घरी कोणीही नसताना एका तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वत:ला गळफास लावून तरुणीने आपलं आयुष्य संपवलं आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्याच्या सुंदरनगरमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएल चौकी अंतर्गत येणाऱ्या एचपीएसईबी कॉलनीमध्ये आयटीआयच्या विद्यार्थीने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर पोलीस आता प्रकरणाचा तपास करत आहेत.

मृत तरुणी तिचा भाऊ आणि वहिणीसोबत सुंदरनगरमध्ये राहत होती. लोकसभा निवडणुका असल्यामुळे घरातील दादा आणि वहिणी मतदान करण्यासाठी गेले होते. त्यावेळी घरात कोणीही नाही हे लक्षात घेत तरुणीने गळफास लावून घेतला.

हेही वाचा: ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा विचित्र अपघात; 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, 24 जण जखमी

दरम्यान, बाहेर असताना मृत तरुणीच्या दादाने तिला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण तिचा फोन लागला नाही. त्यानंतर त्याने शेजाऱ्यांना घरी जाऊन पाहण्यास सांगितलं असता तरुणीने घरात गळफास लावून आत्महत्या केली असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.

त्यानंतर या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी घरामध्ये काही संशयास्पद वस्तू मिळते का याची पाहणी करण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी घटनास्थळावरून तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर तरुणीने नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा आता पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात अधिक माहिती मिळवण्यासाठी मृत तरुणीच्या दादा आणि वहिणीच चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

बायको भडकली, रुग्णालयातच केली नवऱ्याची चपलेनं धुलाई, VIDEO व्हायरल

First published: May 19, 2019, 3:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading