Home /News /news /

पत्नीला आणायला गेलेल्या जावयाला सासरच्या मंडळींनी धू धू धुतला; जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल

पत्नीला आणायला गेलेल्या जावयाला सासरच्या मंडळींनी धू धू धुतला; जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल

सासरी झालेल्या मारहाणीची तक्रार घेऊन जखमी जावई पोलीस ठाण्यात पोहोचला आणि न्यायाची मागणी केली.

    पाटना, 13 मे : पत्नीला आणायला तिच्या माहेरी गेलेल्या जावयाला सासच्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाणीनंतर गंभीर जखमी झालेल्या जावयाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमी जावयाने आपली पत्नी, मेव्हणा आणि मेव्हणीसह सासू-सासरे यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. ही घटना बिहार येथील जमुई (Bihar News) जिल्ह्यातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जमुई जिल्ह्यातील दौलतपूर गावात राहणारा विकास कुमार शुक्रवारी पत्नीला आणण्यासाठी सासरी गेला होता. येथे सासरच्यांनी त्याला मारहाण केली. यानंतर जखमी विकास कुमारने पत्नीवरही मारहाणीचा आरोप केला आहे. सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या विकासच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा दिसल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विकासचं लग्न 2011 मध्ये ओरेया गावातील रिंकीसोबत झालं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून त्याची पत्नी माहेरीच राहतेय. माहेराहून आणण्याबाबत या व्यक्तीला याआधीही मारहाण केली होती. विकास आणि रिंकी यांना एक मुलगा आणि दोन मुली अशी तीन मुले आहेत. सासरच्या मंडळीमुळे जखमी झालेल्या विकास कुमारने सांगितले की, पत्नीच्या घरी नसल्यामुळे त्याला त्रास होत आहे. विकासच्या म्हणण्यानुसार, त्याला 2015 पासून पत्नीला घरी आणायचे होते, परंतु प्रत्येक वेळी त्याच्यावर मारहाण केली जात होती. विकासची पत्नी रिंकी देवी हिला सासरच्या घरी यायचे नाही, तिने आपल्या माहेरच्या घरी राहणे पसंत केल्याचे सांगितले जात आहे. विकासने सांगितलं की, शुक्रवारी सासरी झालेल्या मारहाणीची तक्रार घेऊन जखमी जावई पोलीस ठाण्यात पोहोचला आणि न्यायाची मागणी केली.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bihar, Crime

    पुढील बातम्या