तब्बल 4 किलो सोनं, हिरेजडीत डब्बा अन् चोर करायचा त्यात जेवण !

News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2018 10:50 PM IST

तब्बल 4 किलो सोनं, हिरेजडीत डब्बा अन् चोर करायचा त्यात जेवण !

मुंबई, 11 सप्टेंबर : हैदराबादच्या निजामाच्या शाही खजिन्यावर डल्ला मारणारे चोर अखेर मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहेत. या चोरांची खासियत म्हणजे यातील एक चोर दररोज निजामाच्या शाही डब्यातून जेवायचा...तब्बल 4 किलो सोनं, हिरे आणि माणिकजडीत असा हा डबा आहे.

हैदराबाद पोलिसांनी २ सप्टेंबरला या खळबळजनक चोरीचा छडा लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांनी अगदी फिल्मी स्टाइलने ही चोरी केली. त्यानंतर ते फरार झाले आणि मुंबईला पोहोचले. हे दोन्ही आरोपी मुंबईत 'जीवाची मुंबई' करत होते. पकडले जाण्याच्या आधी ते एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये थांबले होते.

२ सप्टेंबर रोजी चोरांच्या या टोळीतले दोघे व्हेंटिलेटरच्या मार्गाने प्राचीन हवेलीतल्या जुन्या खोल्यांमध्ये शिरले. त्यांनी लोखंडी ग्रील तोडून वस्तूसंग्रहालयात प्रवेश करण्यासाठी रस्ता बनवला आणि चोरी केली. पोलिसांनी परिसरातल्या ३२ सीसीटीव्हीमधलं फुटेज पिंजून काढून ही चोरी पकडली. यासाठी पोलिसांची २२ पथकं तयार करण्यात आली होती.

निजामाच्या वस्तुसंग्रहालयात ४५० वस्तू

निजामाच्या या वस्तुसंग्रहालयात ४५० विविध वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतात. यांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात २५० ते ५०० कोटी रुपयांपर्यंत आहे. १९६७ मध्ये निजाम मीर उस्मान अली खान यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनेक वस्तू अवैध पद्धतीने देशाबाहेर गेल्या. निजामाकडे ४०० टन सोनं आणि ३५० किलो हिरे होते.

===========================================================================================

स्वस्तात खरेदी करा पेट्रोल-डिझेल, वर्षभरात बचत करा 4800 रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2018 10:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close