Delhi Metro मध्ये महिलेला प्रायव्हेट पार्ट दाखवणार निघाला इंजीनिअर, अशी पटली ओळख

Delhi Metro मध्ये महिलेला प्रायव्हेट पार्ट दाखवणार निघाला इंजीनिअर, अशी पटली ओळख

काही दिवसांआधी Delhi Metro मध्ये एका महिलेला प्रायव्हेट पार्ट दाखवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मागच्या बुधवारी पीडित महिलेने ट्विटरच्या माध्यमातून झालेल्या घटनेचा उलगडा केला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : गेल्या दोन दिवसांआधी दिल्लीच्या मेट्रोमध्ये तरुणाने अश्लील चाळे केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अश्लील कृत्य करणारा तरुण हा इंजीनिअर आहे. तो 28 वर्षांचा आहे. तरुणाईची मान शर्मने खाली जाईल असं कृत्य या इंजीनिअर तरुणाने केलं होतं.

काही दिवसांआधी Delhi Metro मध्ये एका महिलेला प्रायव्हेट पार्ट दाखवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मागच्या बुधवारी पीडित महिलेने ट्विटरच्या माध्यमातून झालेल्या घटनेचा उलगडा केला होता. यावेळी तिने सांगितलं की, दिल्ली मेट्रोच्या यलो लाइनमधून जात असताना एका व्यक्तीने त्याची पँट काढली आणि खाजगी भाग दाखविण्यासारखे अत्यंत वाईट कृत्य केले होते.

या महिलेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या युवकाचा फोटो लावून दिल्ली पोलीस आणि दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला टॅगदेखील केले होते. यात युवतीने म्हटले की, या युवकाचे हे घाणेरडे कृत्य पाहून तिला धक्का बसला. ट्विटरवर आपली कहाणी सांगताना या महिलेने लिहिले की "ही व्यक्ती माझ्यासमोर आली तेव्हा मला काही सजलं नाही. नंतर मी पाहिलं की त्याने खाजगी भाग बाहेर काढला. मला आठवतंय त्या वेळी मला कसं वाटलं. तिने जाहीरपणे या युवकाचे फोटो ट्विट केले आणि त्यावर कारवाईची मागणी केली.

इतर बातम्या - मिलिंद देवरांचं राजकारण वडिलांच्या जीवावर, काँग्रेसच्या महिला नेत्याचा आरोप

इंजीनिअर आहे आरोपी

शनिवारी पोलिसांनी मेट्रोमध्ये घाणेरडी कृत्य करणाऱ्या एकाला अटक केली. हा तरुण 28 वर्षांचा असून त्याचे नाव अभिलाष कुमार आहे. अभिलाष गुरुग्रामच्या सेक्टर 22 मध्ये राहतो. हा तरुण मूळचा करनालचा आहे. हा तरुण एका खासगी कंपनीत सिव्हिल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. ही व्यक्ती अविवाहितही आहे.

असं घेतलं आरोपीला ताब्यात

फोटोमध्ये दिसलेल्या अभिलाष पकडल्यानंतर डीएमआरसीने ट्विट करत म्हटले आहे की, सुल्तानपूर प्रकरणातील संशयिताला अटक करण्यात आली आहे. डीएमआरसी सिक्युरिटी सेल आणि एएफसीच्या पथकाने या तरुणाचा शोध घेतला. पोलिसांनी फोन नंबरद्वारे तरूणाला पकडले. वास्तविक, जेव्हा या तरूणाने आपला फोन ऑनलाईन पेमेंटसाठी वापरला तेव्हा पोलिसांना त्याच्या जागेची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याला पकडले.

इतर बातम्या - मोहन भागवतांच्या घटस्फोटाच्या वक्तव्यावर भडकली सोनम कपूर, म्हणाली...

मेट्रोच्या आत एका पुरुषाने वाईट कृत्य केल्याची तक्रार मिळाल्यानंतर व्यवस्थापनाने घाटोरनी पोलीस ठाण्याशिवाय तक्रारदाराकडेही संपर्क साधला, अशी माहिती डीएमआरसीकडून देण्यात आली. या प्रकरणात पीडितेला सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन फिर्यादीला देण्यात आले. या प्रकरणात घाटोरनी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती आणि पोलीस त्याचा तपास करत होते.

इतर बातम्या - आईला रोज मारहाण करणाऱ्या पित्याला मुलानेच संपवलं, डोक्यात घातली लाकडी फळी

First published: February 17, 2020, 11:57 AM IST
Tags: delhi

ताज्या बातम्या