रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी लक्षणं होतीच, नायर हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णाची आत्महत्या

रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी लक्षणं होतीच, नायर हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णाची आत्महत्या

एका 43 वर्षीय रुग्णाने बाथरुममध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मुंबईच्या नायर रुग्णालयात घडली आहे.

  • Share this:

मुंबई, 06 जून : मुंबईत कोरोना रुग्णाने आत्महत्या केल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. एका 43 वर्षीय रुग्णाने बाथरुममध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मुंबईच्या नायर रुग्णालयात घडली आहे. या घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत रुग्ण हे माहिमला राहणारे होते. 31 मे पासून कोरोनाची लक्षण असल्यामुळे त्यांना नायर रुग्णालय दाखल करण्यात आलं. खरंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता अहवाल निगेटिव्ह आला. पण त्यांना कोरोनाची लक्षणं म्हणजेच सर्दी आणि ताप असल्यामुळे त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आलं आणि दुसरी चाचणी करण्यासाठी स्वॅब टेस्ट करण्यात आली.

गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूमागे धक्कादायक खुलासा, अननसात नव्हते भरले फटाके तर...

दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीचे रिपोर्ट येणं अद्याप बाकी असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मृत रुग्ण हे सकाळी बाथरुममध्ये गेले. 10 वाजता वॉर्डमधील एकाच्या लक्षात आलं की बराच वेळ बाथरुमचा दरवाजा बंद आहे. त्यानंतर याची माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना देण्यात आली.

अधिकाऱ्यांनी तात्काळ बाथरुमचा दरवाजा तोडला. तेव्हा रुग्णाने टॉवेलने स्वत:ला गळफास लावून घेतला असल्याचं समोर आलं. कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते मानसिकरित्या खचले होते. रिपोर्ट निगेटिव्ह आले पण तरी लक्षणं असल्यामुळे त्यांना डिप्रेशन आलं असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

मुंबईत टँकर आणि पल्सरचा भीषण अपघात, आगीत होरपळल्याने तरुणाने जागीच सोडला जीव

संपादन - रेणुका धायबर

First published: June 6, 2020, 9:26 AM IST

ताज्या बातम्या