Home /News /news /

कोरोनाच्या भीतीने वडिलांनी केली आत्महत्या, कुटुंबासाठी लिहली धक्कादायक सुसाइड नोट

कोरोनाच्या भीतीने वडिलांनी केली आत्महत्या, कुटुंबासाठी लिहली धक्कादायक सुसाइड नोट

57 वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. कारण त्याला कोरोना विषाणू झाल्याचा संशय आला होता.

    उडुपी, 26 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) जगभरात खळबळ उडाली आहे. भारतात या विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही सतत वाढत आहे. दरम्यान, कर्नाटकमधून (Karnataka)एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 57 वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. कारण त्याला कोरोना विषाणू झाल्याचा संशय आला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे आणि म्हणूनच आत्महत्या करीत असल्याचे सांगून एक सुसाइड नोट लिहली होती. तसेच, त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची चाचण्या करण्यास सांगितलं आहे. हे वाचा -महाराष्ट्रात कोरोनामुळे मृतांचा आकडा 4वर, वाशीमध्ये एका महिलेचा मृत्यू कर्नाटकातील उडुपी इथला रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने घराबाहेर झाडावर लटकून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी आणि दोन मुलं असं त्यांचं कुटुंब होतं. त्याच्या पत्नीला आणि दोन्ही मुलांना होम क्वारंटाईनसाठी सांगितलं होतं. यात डॉक्टरांनी दिलेल्या यादीमध्ये मृत व्यक्तीचं नावही नव्हतं आणि त्याच्यामध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षण नव्हते. तरीदेखील व्यक्तीने आत्महत्या केल्याने सगळिकडे एकच खळबळ उडाली आहे. हे वाचा -तरुणीला हे शोभतं का? लॉकडाऊन तर मोडलंच वर पोलिसांना चावून काढलं रक्त, पाहा VIDEO मृत व्यक्तीला खरंच कोरोना झाला होता का याबाब शवविच्छेनद रिपोर्ट आल्यावर समजेल असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान, भारतातील कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा 15 झाला आहे. तर 600 हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मृतांचा आकडा 4 वर पोहोचला आहे. गुरुवारी 24 मार्च रोजी एका महिलेचा मृत्यू झाल्याचा अहवाल आहे. ती कोरोनामुळे त्रस्त होती. महाराष्ट्रात कोविड -19 च्या दोन नवीन रुग्णांची लागण झाली. राज्यात संक्रमित एकूण 124 लोकांना कोरोना झाल्याची माहिती आहे. हे वाचा - धक्कादायक! 'लॉकडाऊन असताना घराबाहेर का गेला'? प्रश्न विचारताच भावाचाच केला खून
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या