चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळला

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळला

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

अहमदनगर,23 फेब्रुवारी: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर मारेकरी पतीने पत्नीचा मृतदेह शेतात नेऊन पेट्रोल टाकून जाळल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. राहाता तालुक्यातील एकरुखे गावात ही घटना घडली आहे. छाया लेंडे असं मृत महिलेचं नाव आहे.

सुनील लेंडे असे आरोपी पतीचे नाव असून तो स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. पत्नीचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह शेतात पेट्रोल टाकून जाळल्याची कबुलीही त्याने दिली आहे. आरोपी पतीविरुध्द खूनाचा गुन्हा नोंदवून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण..?

आरोपी सुनील लेंडे हा पत्नीच्या चारित्र्यावर कायम संशय घेत होता. शनिवारी संध्याकाळी आरोपीने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केला. त्यात छायाचा जागेवरच मृत्यू झाला. रात्री पत्नीच्या मृतदेहावर पोते व पेट्रोल टाकून शेतापासून काही अंतरावर जाळला. त्यानंतर आरोपी घरी आला. पत्नीच्या नातेवाइकाचे निधन झाले असून ती माहेरी गेली असल्याचे त्याने आई-वडिलांना सांगितले. त्याच्या मुलांना आई-वडिलांसोबत पत्नीच्या माहेरी पाठवून दिले. नंतर मात्र सकाळी उठून त्याचे स्वतःहून राहाता पोलिस स्टेशन गाठून झालेला प्रकार सांगितला. पोलिसांनी सुनील याला अटक केली आहे. त्यानंतर छाया हिचा भाऊ सुनील तरस यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही आहे. बीड शहरात अशीच एक घटना घडली आहे. घटस्फोटीत महिलेने लग्नाला नकार दिला म्हणून एका माथेफिरू तरुणाने तिच्या डोक्यात दगड घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली. यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी पेठ भागात घडली. सुनील दत्तात्रय जाधव असे आरोपीचे नाव आहे. सुनील जाधव याचे महिलेवर एकतर्फी प्रेम आहे. या एकतर्फी प्रेमातून सुनीलने महिलेवर हल्ला केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांना आरोपी सुनील जाधव याला अटक केली आहे.

हेही वाचा..

'मी विधानसभेत येतो, मग नाय तुला फाडला तर...', शिवसेना आमदाराचं ओपन चॅलेंज

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा.. एक वर्षाच्या तान्हुल्याला घेऊन महिला पोलीस कर्तव्यावर

आदित्य नारायण या मुलीशी करणार लवकरच लग्न, नेहा कक्करनं केला खुलासा

First published: February 23, 2020, 5:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading