दुचाकीवरून जात असताना म्हशीला मारली लाथ आणि...पुढे काय झालं पाहा VIDEO

दुचाकीवरून जात असताना म्हशीला मारली लाथ आणि...पुढे काय झालं पाहा VIDEO

म्हशीला लाथ मारण्याच्या नादात त्याचा मात्र तोल सुटतो आणि काय होतं ते या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं.

  • Share this:

मुंबई, 02 ऑक्टोबर : करावे तसे भरावे ही म्हणावे ही म्हण आपल्याला इयत्ता 4 थीमध्ये आपण शिकलेली आहे. अनेकदा आपण प्राणी किंवा माणसाचं वाईट चिंतायला अथवा करायला जातो आणि तसाच प्रकार पुन्हा आपल्यासोबत घडतो ज्याला आपण ज्याचं जसं कर्म तसं फळ असं म्हणतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर वाईट केल्यावर वाईटच होतं.

गेल्या काही दिवसांपूर्वी प्राण्याला लाथ मारल्यामुळे खाली घरसून पडलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता आणखीन एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की दुचाकीवरून दोन तरुण जात आहेत आणि बाजूलाच रस्त्यात अनेक म्हशी उभ्या आहेत. यातल्या एका म्हशीला हा तरुण मजेनं पायाने ढकलण्याचा प्रयत्न करतो. या म्हशीला लाथ मारण्याच्या नादात त्याचा मात्र तोल सुटतो आणि काय होतं ते या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं.

हे वाचा-अंड्यावर हातोडा पडला तर काय होईल? अनपेक्षित VIDEO मुळे नेटकरी हैराण

म्हशीला लाथ मारण्याच्या मस्करीत दुचाकीवरच्या तरुणाचा तोल जातो आणि तो खाली कोसळतो. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ अडीच हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी जैसी करनी वैसी भरनी, या तरुणाला चांगलीच अद्दल घडली सारख्या तुफान कमेंट्स केल्या आहेत. अनेक युझर्सनी तर या तरुणाप्रती संताप व्यक्त केला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 2, 2020, 4:13 PM IST

ताज्या बातम्या