पत्नीच्या लठ्ठपणामुळे पतीने दिला तिहेरी तलाक

पत्नीच्या लठ्ठपणामुळे पतीने दिला तिहेरी तलाक

नवरा आणी सासूने वारंवार छळ केला जात आहे. त्याचबरोबर सासूकडून माझ्या लठ्ठपणाबाबत सतत अभद्र बोलणं एकावं लागायचं असा दावा पिडीत महिलेने केला आहे.

  • Share this:

मध्यप्रदेश, 25 ऑक्टोबर : मध्यप्रदेश येथील जाभुआ जिल्ह्यात एका माणसाने बायकोला तिहेरी तलाक दिल्यानं अटक करण्यात आली आहे. बायकोच्या लठ्ठपणामुळे तलाक दिल्याची माहिती समोर आली आहे. नवरा अरिफ हुसैन दिवान आणि सासू हुसैन बानो यांच्या विरोधात मेघनगर पोलीस स्टेशनमध्ये 24 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. विवाहित महिलांच्या सुरक्षेसाठी नव्यानं स्थापन केलेल्या मुस्लिम महिला अध्यादेश 2018 अंतर्गत  दाखल झालेलं हे पहिलं प्रकरण आहे.

तक्रार दाखल करणारी महिला मेघनगर मधील शेरानी मोहल्ला इथे राहत होती. काही वर्षांपूर्वी तिचे अरिफ सोबत लग्न झाले. लग्नानंतर त्यांना दोन लहान मूलं देखील आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नाच्या काही वर्षांनतर अरिफ सतत महिलेला लठ्ठपणाचे टोमणे द्यायचा. तक्रादार महिला शरीराने जाड असल्याने तिचा छळ केला जात होता. अरिफसोबत त्याची आईसुद्धा पिडित महिलेचा छळ करत होती. त्यांच्या अशा वागण्याने महिलेला प्रचंड त्रास होऊ लागला. त्यामुळे तिने नवऱ्याचे घर सोडून मेघनगरमध्येच राहत असलेल्या भावाच्या घरी राहायला गेली.

12 ऑक्टोबरला अरिफ आणि त्याच्या आईने तिच्या भावाच्या घरी जाऊन महिलेला मारहाण करत भांडण केले. पुढे भांडण वाढत गेल्याने अरिफने तिच्या कुटुबीयांकडून हुंड्याची मागणी केली आणि अरिफने आपल्या बायकोला तिहेरी तलाक देत असल्याचे सांगितले. मला माझ्या नवऱ्याकडून आणि सासूकडून वारंवार छळ केला जात आहे. त्याचबरोबर सासूकडून माझ्या लठ्ठपणाबाबत सतत अभद्र बोललं जातं असा दावा पिडीत महिलेने केला आहे.महिलेच्या तक्रारीनंतर अरिफ आणि त्याच्या आई विरोधात आयपीसी कलम 323, 498ए, 506 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पेटवाड न्यायालयात सर्व पुरावे आणि साक्षदारांचे जबाब नोंदण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात आलेल्या तिहेरी तलाक अध्यादेशानुसार सहा महिन्याच्या कारवासाची तरतूद त्यात करण्यात आली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2018 07:39 AM IST

ताज्या बातम्या