दारूच्या नशेत टायर फुटलेली चालवत होता कार, पोलीसही गेले चक्रावून!

दारूच्या नशेत टायर फुटलेली चालवत होता कार, पोलीसही गेले चक्रावून!

पोलिसांनी एक फोटो ट्वीट केला आहे. यामध्ये कारचा पार चुराडा झाला आहे. ठिकठिकाणी कारचं प्रचंड नुकसान झालं आहे

  • Share this:

मुंबई, 21 डिसेंबर : दारूची नशा वाईटच...आता दारू प्यायल्यावर माणूस काय करू शकतो आणि काय नाही, याचं ताज उदाहरण समोर आलं आहे. वाहतूक पोलीस नेहमी सांगतात की, दारू पिऊन गाडी चालवू नका, पण तळीरामांना याबद्दल काहीही देणंघेणं दिसत नाही. एका दारूड्याने इतकी दारू प्यायली होती की, कारचे टायर तुटून पडले तरी या पठ्ठ्याला शुद्ध नव्हती.

इंग्लंडमधील यॉर्कशायरमध्ये ही अजब घटना समोर आली.  साउथ यॉर्कशायरच्या पोलिसांनी ट्वीट करून या घटनेची माहिती देऊन खबरदारी घेण्याची सुचना केली आहे.  या पोलिसांनी एक फोटो ट्वीट केला आहे. यामध्ये कारचा पार चुराडा झाला आहे. ठिकठिकाणी कारचं प्रचंड नुकसान झालं आहे. कारचा असा कोणताच हिस्सा डॅमेज झाल्यापासून वाचला नाही. कार चालवणारा पठ्ठ्या हा प्रचंड दारू प्यायलेला होता. दारूच्या नशेत तो Peugeot ही कार चालवत होता. त्याने इतकी दारू प्यायली होती की, कारचे टायर फुटले आणि तुटून पडले तरीही त्याला सुद्ध नव्हती.

वाहतूक पोलिसांनी या दारुड्याला ताब्यात घेतलं आणि अटक केली. त्याच्याकडे कारचालवण्याची कोणतीही कागदपत्रं नव्हती. पोलिसांनी लायन्सेस, विना इश्युरन्स आणि दारू पिऊ गाडी चालवण्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे. एकीकडे देशभरात दारू पिऊन आणि रॅशड्राईव्हच्या घटनांना आळा बसावा म्हणून जगभरात कडक कायदे करण्यात आले आहे. तरी सुद्धा अशा घटना वारंवार घडत आहे.

Tags:
First Published: Dec 21, 2019 08:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading