मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /जखमी असल्याचं सांगून 90 लाख सोन्याची तस्करी; हा प्रकार पाहून कस्टम अधिकारीही चक्रावले

जखमी असल्याचं सांगून 90 लाख सोन्याची तस्करी; हा प्रकार पाहून कस्टम अधिकारीही चक्रावले

Gold Smuggling पायाच्या बँडेजमध्ये लपवून जवळपास 90 लाख रुपयांचं सोनं त्यानं लपवून आणलं होतं. पण अधिकाऱ्यांच्या नजरेतून वाचून ते जाऊ शकला नाही.

Gold Smuggling पायाच्या बँडेजमध्ये लपवून जवळपास 90 लाख रुपयांचं सोनं त्यानं लपवून आणलं होतं. पण अधिकाऱ्यांच्या नजरेतून वाचून ते जाऊ शकला नाही.

Gold Smuggling पायाच्या बँडेजमध्ये लपवून जवळपास 90 लाख रुपयांचं सोनं त्यानं लपवून आणलं होतं. पण अधिकाऱ्यांच्या नजरेतून वाचून ते जाऊ शकला नाही.

चेन्नई, 16 मे : पाय जखमी असल्याचं नाटक करून लपवून सोनं (Gold Smugling) आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या भामट्याला कस्टम अधिकाऱ्यांनी (Custom Officers) पकडलं आहे. चेन्नई विमानतळावर (Chennai Airport) या भामट्याला अधिकाऱ्यांनी अटक केली. पायाच्या बँडेजमध्ये (Bandage) लपवून जवळपास 90 लाख रुपयांचं सोनं (Gold worth 90 lakh) त्यानं आणलं होतं. पण अधिकाऱ्यांच्या नजरेतून वाचून तो जाऊ शकला नाही.

(वाचा-Cyclone Tauktae: उद्या मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीसह सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट)

चेन्नई एअरपोर्टवर पकडण्यात आलेल्या या व्यक्तीनं त्याचं नाव मोहम्मद अशरफ असल्याचं सांगितलं. त्याचं वय साधारणपणे 21 वर्षे आहे. दुबईहून एमिरेट्सच्या फ्लाईटमधून तो चेन्नईला आला होता हा व्यक्ती ग्रीन चॅनलमधून घाई-घाईनं बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता. पण कस्टमच्या अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आला म्हणून त्यांनी त्याला थांबवलं आणि त्याची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे काही आहे, का याची तपासणीदेखिल करण्यात आली. त्यावेळी जे समोर आलं त्यानं सर्वच थक्क झाले.

(वाचा-खते महाग करून केंद्राने मोडलं शेतकऱ्यांचं कंबरडं, राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा)

पोलिसांनी या व्यक्तीची तपासणी केली तेव्हा त्याच्या दोन्ही पायांना पट्टी बांधलेली होती. याबाबत अधिकाऱ्यांनी विचारले तर त्यानं पाय जखमी असल्याचं सांगितलं. मात्र तरीही अधिकाऱ्यांचा संशय कायम होता. त्यामुळं त्यांनी या व्यक्तीला पायाचं बँडेज उघडायला सांगितलं. जेव्हा त्यानं ते उघडलं त्यावेळी या व्यक्तीनं त्यामध्ये लपवून जवळपास 1 किलो 80 ग्रॅम सोनं आणल्याचं समोर आलं. या सोन्याची किंमत तब्बल 90 लाख रुपये होती.

अधिकाऱ्यांनी आरोपीकडून हे सोनं जप्त केलं. त्यानंतर चौकशी केली असता एअरपोर्टच्या बाहेर असलेल्या एका व्यक्तीला ते सोनं द्यायचं असल्याचं आरोपीनं सांगितलं. त्यानंतर इब्राहीम नावाच्या आणखी एका व्यक्तीला अधिकाऱ्यांनी अटक केली. अतिशय शिताफीनं या व्यक्तीनं सोनं लपवून आणण्याचा प्रयत्न केला होता, पण कस्टम अधिकाऱ्यांच्या नजरेतून तो सुटू शकला नाही.

First published:

Tags: Airport, Chennai, Gold