मुंबई, 10 जुलै: आपल्या लग्नाचा वाढदिवस मित्रांसोबत साजरा करत असताना अचानक आलेल्या गेस्टमुळे मोठा गोंधळ उडाला. बऱ्याचदा अशा अनपेक्षित येणाऱ्या पाहुण्यांमुळे आपली तारांबळ उडते पण हे पाहुणे विशेष होते. तरुण आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापत असताना अचानक आलेल्या माकडामुळे गोंधळ उडाला.
समोर असलेला केक पाहून माकड्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि त्यानं अख्खा केक तोंडात पकडून धून ठोकली. हा व्हिडीओ IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी ट्वीट केला आहे. हा माकडाचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Celebrating wedding anniversary in Forest is an experience altogether....
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता माकडाचं एक पिल्लू केक पाहून झाडावरून उड्या मारत खाली उतरतं आणि काही कळण्याआत तोंडात केक घेऊन झाडावर पुन्हा पळून जातं.
सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ 9 जुलैला दुपारी पोस्ट केला होता. हा व्हिडीओ आतापर्यंत 1 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर 200 हून अधिक लाईक्स, 50 रिट्वीट्स आणि खूप कमेंट्स आल्या आहेत. माकडाच्या करामतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.