• होम
  • व्हिडिओ
  • क्रुरतेचा कळस, आईला उपाशी ठेवून रोज करायचा बेदम मारहाण
  • क्रुरतेचा कळस, आईला उपाशी ठेवून रोज करायचा बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2018 05:13 PM IST | Updated On: Aug 10, 2018 05:13 PM IST

    10 ऑगस्ट : ही घटना कोलकत्यामध्ये बी.एल. मुखर्जी रस्तावरील आहे. शांती प्रभा देवी या आपल्या दोन मुलांसोबत राहतात. पण 10 वर्षांपूर्वी त्यांचा मोठा मुलगा विकास देव त्यांना सोडूव दत्तापुरमध्ये राहायला गेला. त्यानंतर शांती प्रभा या त्यांच्या लहान मुलगा बल्लू प्रसाद देवसोबत राहायला लागल्या. पण त्यांचा हा मुलगा त्यांना रोज मारहाण करायचा. शेजाऱ्यांना हे माहित होतं की तो आपल्या आईचा रोज छळ करायचा पण ते यावर काही करू शकले नाही कारण त्यांचं घर नेहमीच बंद असायचं. एक दिवस त्यांच्या शेजारी राहणाऱ्या प्रताषा राय चौधरी यांनी शांती प्रभा यांना मारहाण करतानाचे फोटो आणि व्हिडिओ काढले आणि ते सोशल मीडियावर शेअर केले. सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले. पोलिसांच्या हाती हे लागताच त्यांनी बल्लू प्रसाद याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, शांती देव यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close