S M L

ममता बॅनर्जी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता !

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. ममता बॅनर्जी आजपासून मुंबईच्या दौर्यावर आहेत. 3 नोव्हेंबरपर्यंत ममता बॅनर्जींचा मुंबई दौरा असणार आहे.

Chandrakant Funde | Updated On: Oct 31, 2017 07:12 PM IST

ममता बॅनर्जी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता !

मुंबई, 31 ऑक्टोबर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. ममता बॅनर्जी आजपासून मुंबईच्या दौर्यावर आहेत. 3 नोव्हेंबरपर्यंत ममता बॅनर्जींचा मुंबई दौरा असणार आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत ममता बॅनर्जी कधीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

केंद्रात आणि राज्यात शिवसेनेला भाजपने सत्तेतला पुरेसा वाटा न दिल्याने उद्धव ठाकरे मोदींवर नाराज आहेत. तर ममता बॅनर्जी या पहिल्यापासूनच कट्टर मोदी विरोधक आहेत. त्यामुळे भाजपविरोधी पक्षांची एकत्रित मोट बांधण्याचे ममता बॅनर्जींचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून ममता बॅनर्जी उद्धव ठाकरेंनी भेटणार असल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2017 07:12 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close