नरेंद्र मोदींचा चाणक्य आता ममता बॅनर्जींना करणार राजकीय मदत

Mamta Banerjee : 2021मध्ये राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांनी आता कंबर कसली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 07:12 PM IST

नरेंद्र मोदींचा चाणक्य आता ममता बॅनर्जींना करणार राजकीय मदत

कोलकाता, 06 जून : लोकसभा निवडणुकीत तृणमुल काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यानंतर आता तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2021 विधानसभा निवडणुकीकरता कंबर कसली आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी, नितीश कुमार यांच्यासाठी चाणक्यची भूमिका बजावणारे प्रशांत किशोर ममतांना मदत करणार आहे. ममता बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. या चर्चेअंती प्रशांत किशोर तृणमुल काँग्रेससाठी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखणार आहेत. कोलकातामध्ये ही बैठक पार पडली.



Loading...


2014मध्ये बजावली महत्त्वपूर्ण भूमिका

प्रशांत किशोर यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी भाजप, नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची रणनिती आखली. त्यानंतर भाजपला 2014मध्ये केंद्रात सत्ता मिळाली. तर, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. 2014मध्ये देखील भाजपनं चांगलं यश मिळवलं होतं. त्यानंतर प्रशांत किशोर यांच्याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या.

दुसरीकडे प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासाठी देखील कामं केलं. त्यावेळी देखील जेडीयुनं राज्यात सत्ता मिळवली. तर, नितीश कुमर बिहारचे मुख्यमंत्री झाले. प्रशांत किशोर यांची कामगिरी पाहता त्यांच्याकडे आता ममता बॅनर्जी यांनी देखील हात पुढे केला आहे.

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसचं संख्याबळ घसरलं. तर, भाजपनं मात्र मुसंडी मारली. हे सारं चित्र पाहता ममता बॅनर्जी 2021मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकरता कोणतीही जोखीम घ्यायला तयार नाहीत. त्याची तयारी त्यांनी आतापासून केली आहे. त्यासाठी त्यांनी रणनीतीकार प्रशांत किशोर यांची मदत घेतली आहे.


VIDEO : लोकायुक्तांच्या ठपक्यानंतर प्रकाश मेहता म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 06:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...