कुपोषणाचं भीषण वास्तव, मेळघाटात दोन महिन्यात 84 मुलांचा मृत्यू

कुपोषणाचं भीषण वास्तव, मेळघाटात दोन महिन्यात 84 मुलांचा मृत्यू

गेल्या दोन महिन्यात मृत्यू झालेल्या मुलांची संख्या 84 झाली आहे. मुंबई हायकोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ही माहिती पुढं आली.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई,ता.17, ऑक्टोबर : राज्य सरकार कितीही दावा करत असलं तरीही कुपोषणाचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय. या महिन्यात पहिल्या दोन आठवड्याच मेळघाटात १२ मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती बुधवारी मुंबई हायकोर्टासमोर पुढं आली. मेळघाटातील कुपोषण प्रकरणावर याचिकाकर्ते बंडू साने यांनी हायकोर्टाला माहिती दिली. सप्टेंबर महिन्यात एकूण ७२ मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची माहिती गेल्या सुनावणीला हायकोर्टासमोर मांडण्यात आली होती. त्यामुळं गेल्या दोन महिन्यात मृत्यू झालेल्या मुलांची संख्या 84 झाली आहे.  कुपोषणाबाबत  सामाजिक कार्यकर्त्यांनी  दाखल केलेल्या  जनहित याचिकेवर सध्या हायकोर्टात सुनावणी सुरू आहे.

आदिवासी विभागांत प्रत्यक्षात जाऊन पाहाणी केल्यानंतर अधिकारी सुकाणू समितीला काय अहवाल देतात याचा तपशील पुढील सुनावणीला सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. गेल्या सुनावणीला कोर्टाच्या निर्देशांनुसार स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीतील किती जण प्रत्यक्षात जाऊन आदिवासी विभागांत पाहाणी करतात असा सवाल हायकोर्टानं विचारला होता.

त्यानुसार जिल्हाधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभागाचा अधिकारी हे प्रत्यक्षात जाऊन पाहणी करून त्याचा अहवाल मुख्य समितीला वेळोवेळी देत असतात अशी माहीती हायकोर्टाला देण्यात आली. मात्र ऑगस्ट महिन्यानंतर ही पाहाणी झालेली नाही तसंच १८ ऑगस्टला सुकाणू शेवटची बैठक झाली होती अशी कबुली राज्य सरकारच्यावतीनं हायकोर्टात देण्यात आली.

सरकार कुपोषण दूर व्हावं यासाठी गेली अनेक वर्ष राज्य सरकार अनेक योजना राबवतं मात्र त्याचा काहीही परिणाम होत नाही. परिस्थिती फारशी बदलत नसल्याने न्यायालयानेही तीव्र नाराजी व्यक्त केलीय. सरकार ठोस उपाययोजना का करत नाही असा सवालही न्यायालयाने केला आहे.

VIDEO : या ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास

First published: October 17, 2018, 6:35 PM IST

ताज्या बातम्या