Home /News /news /

मालेगाव पुन्हा हादरलं, घरात घुसून महिलेवर गोळीबार

मालेगाव पुन्हा हादरलं, घरात घुसून महिलेवर गोळीबार

काही दिवसांपूर्वी एका नगरसेवकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती.

मालेगाव,  16 जानेवारी : मालेगाव शहरात गुंडगिरीने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. काही दिवसांपूर्वी एका नगरसेवकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा गोळीबाराने मालेगाव हादरले. घरात घुसून एका महिलेवर गोळीबारात करण्यात आला असून यात तिचा मृत्यू झाला शहरातील भायगाव शिवारातील संविधान नगरमध्ये आज दुपारी अज्ञाताने घरात घुसून एका महिलेवर थेट गोळीबार केला त्यात ज्योती भटू डोंगरे ही महिला जागीच ठार झाली. गोळीबार केल्यानंतर मारेकरी फरार झाला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपाधीक्षक शशिकांत शिंदे यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. महिलेवर गोळीबार का करण्यात आला याचा पोलीस तपास करीत आहे.15 दिवसात दिवसा ढवळ्या  गोळीबाराच्या 2 घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यावर तलवारीने हल्ला दरम्यान, बीड शहरात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यावर तलवारीने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. राहुल फरताळे असं या जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. बीड शहरातील सारडा सर्कलजवळ आज दुपारी तीनच्या दरम्यान भर रस्त्यात ही घटना घडली. चौकात उभा असलेल्या राहुल फरताळेवर अज्ञात आलेल्या हल्लेखोरांनी  डोळ्यात मिरची पूड टाकली आणि तलवारीने वार केले. हल्ला करून हे हल्लेखोर फरार झाले. या प्रकरणी अज्ञात हल्ले खोरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Malegaon, News

पुढील बातम्या