राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसला धक्का, या आमदाराने गुंडाळला झेंडा!

राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसला धक्का, या आमदाराने गुंडाळला झेंडा!

काँग्रेसचे वजनदार नेते अब्दुल सत्तार यांनी पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश घेत असताना मालेगावचे काँग्रेस आमदार आसिफ शेख यांनी काढलेल्या रैलीत पक्षाचा झेंडा गुंडाळून आहे.

  • Share this:

बब्बू शेख, प्रतिनिधी

मालेगाव, 02 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेमध्ये जबरदस्त इनकमिंग सुरू आहे. राष्ट्रवादीमधील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी भाजप आणि सेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडल्याची चर्चा आहे. त्यात आता काँग्रेसलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मालेगावचे आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देण्यार असल्याचं सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ आता काँग्रेसमध्येदेखील गळती सुरू झाली आहे. काँग्रेसचे वजनदार नेते अब्दुल सत्तार यांनी पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश घेत असताना मालेगावचे काँग्रेस आमदार आसिफ शेख यांनी काढलेल्या रैलीत पक्षाचा झेंडा गुंडाळून आहे. काँग्रेसच्या झेंड्या ऐवजी त्यांनी पांढरा झेंडा घेऊन रॅली काढली. त्यामुळे आसिफ शेखदेखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे.

अब्दुल सत्तारांच्या पक्ष प्रवेशावर नवा ट्विस्ट, आता हातावर बांधणार...!

काँग्रेसचे बंडखोर माजी मंत्री अब्दुल सत्तार सेनेत प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 12.30 वाजता खुद्द उद्धव ठाकरे मातोश्रीवर सत्तारांना शिवबंधन बांधणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. भाजपच्या महाजनादेश यात्रेवेळी मुख्यमंत्र्य़ांसोबत रथात दिसणाऱ्या सत्तार यांनी भाजपमध्ये जाण्याचा विचार सोडून दिला असल्याचं सांगण्यात आलं आहे. शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी सत्तार समर्थकांसोबत मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.

इतर बातम्या - अब्दुल सत्तारांच्या पक्ष प्रवेशावर नवा ट्विस्ट, आता हातावर बांधणार...!

लोकसभा निवडणुकांच्या आधी सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार का अशा चर्चांणा उधान आलं होतं. अब्दुल सत्तार यांना भाजपमधून बडतर्फ करण्यात आलं होतं. अब्दुल सत्तार यांना सिल्लोड मतदारसंघातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करण्यात आला. त्यामुळे काँग्रेस पक्षातून बडतर्फ केलेले अब्दूल सत्तार आता पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

इतर बातम्या - ... तर राष्ट्रवादी दिसणारच नाही, अमित शहांचा पवारांवर घणाघात

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये पोहोचलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे यात्रेच्या रथावर पहायला मिळाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. याआधी सिल्लोडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सत्कारावरून भाजप कार्यकर्ते आणि सत्तारांमध्ये वादावादीदेखील झाली होती.

माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अब्दुल सत्तार यांनीही विखेंची भेट घेतली होती. त्यामुळे सत्तार विखेंसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली होती. विखेंच्या अनुभवाचा भाजपला फायदा होईल, असेही महाजन त्यावेळी म्हणाले होते. तेव्हा अब्दुल सत्तार यांनी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले होते. राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील, तो निर्णय आपल्याला मान्य असेल. त्या निर्णयासोबत आपण राहणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं होतं.

इतर बातम्या - बहिणीची शेजारच्या मित्रासोबत सुरू होती Love Story, भावाने लावली प्रियकराची वाट!

अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीच काँग्रेसमध्ये बंडाचे निशाण फडकावलं होतं. पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नाहीतर त्यांनी सेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचीही भेट घेतली होती. परंतु, ऐनवेळी त्यांनी उमेदवारी मागे घेतली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्तार यांनी आता भाजपची वाट निवडली होती. परंतु त्यांना भाजपमधून विरोध झाला.

VIDEO: डान्सचा जलवा चाहत्यांच्या शिट्ट्या; हिला म्हणतात पाकची सपना चौधरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 12:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading