कोरोनाच्या दहशतीत 'मलेरिया'चं थैमान, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात सर्वाधिक रुग्ण

कोरोनाच्या दहशतीत 'मलेरिया'चं थैमान, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात सर्वाधिक रुग्ण

देशाची आर्थिक राजधानी मुंबई सध्या कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडली आहे.

  • Share this:

मुंबई, 2 सप्टेंबर: देशाची आर्थिक राजधानी मुंबई सध्या कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडली आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतच आहेत. मात्र, कोरोनाची दशहत कायम असताना मुंबईत आणखी एका साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.  मुंबईतील उपनगरांत मलेरियानं थैमान घातलं आहे.

हेही वाचा...महाआघाडी सरकार पडेल, ही भाबडी आशा सोडा, एकनाथ खडसेंनी स्वपक्षीयांचे टोचले कान

धक्कादायक म्हणजे मुंबई उपनगराचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात सर्वाधिक मलेरियाचे रुग्ण सापडले आहेत. म्हणजे आधी कोरोना आणि आता मलेरिया, अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकट्या जी दक्षिण प्रभागात 300 हून अधिक मलेरियाचे रुग्ण सापडले आहेत. ज्याला अनेक कारणं आहेत. मात्र, आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहेत.

कोणत्या वॉर्डात किती मलेरियाचे रुग्ण?

जी दक्षिण--300 रुग्ण

इ वॉर्ड-- 100रुग्ण

जी उत्तर--100 रुग्ण

एफ दक्षिण--100 रुग्ण

1 महिन्यात वाढला 500 टक्के कोरोनाचा संसर्ग

देशभरातील कोरोनाच्या एकूण प्रकरणांपैकी 21 टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. अद्यापही राज्यात कोरोना रुग्णांवर नियंत्रण आणणे शक्य झाले नाही. अनलॉक - 4 मध्ये विविध क्षेत्रातील नियम शिथिल करण्यात आले आहेत. याच्या आधारावर राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये संसर्ग तब्बल 500 टक्क्यांनी वाढला आहे. बीड, सांगली, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि नागपूर या जिल्ह्यात अनलॉक - 4 मध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने यामागील कारणे सांगितली आहेत.

पुरामुळे राज्यात मोठा फटका बसला आहे. त्यात कोरोनाच्या संसर्गात 780689 रुग्णसंख्येसह देशातील सर्वात जास्त संख्या असलेले राज्य म्हणून समोर आले आहे. म्हणजेच देशातील एकूण 21 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे ही शहरे कोरोना हॉटस्पॉट आहेत. यानंतर आता आणखी पाच जिल्ह्यांमुळे चिंता वाढली आहे. या भागात संसर्गाची प्रकरणं तब्बल 500 टक्क्यांनी वाढत असल्याचे दिसत आहे.

बीडमध्ये गेल्या 31 दिवसात रुग्णसंख्या 757 पासून 4716 पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच 600 टक्क्यांची वाढ झाली आहे. उस्मानाबादमध्ये 1 ऑगस्ट रोजी 971 रुग्णसंख्या होती जी 31 ऑगस्टपर्यंत वाढून 5780 पर्यंत पोहोचली आहे. नागपूरात एका महिन्यात रुग्णसंख्या 4835 हून वाढून 27241 पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच तब्बल 500 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर सांगली आणि कोल्हापूरमध्येही साधारण 450 ते 500 टक्क्यांपर्यंत संसर्गात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा...शेण खाल्ल्यानंतर मंत्री असल्याची लाज वाटत असेल तर...आदित्यंवर अत्यंत खोचक टीका

आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले की, या सर्व जिल्ह्यात सरकारी रुग्णांलयांची संख्या अत्यंत कमी आहे. पहिल्यापासूनच सरकारने या ग्रामीण भागात फार लक्ष दिले नव्हते. ग्रामीण व्यतिरिक्त खासगींची संख्याही कमी आहे. याबरोबरच येथे चाचण्याही फारशा उपलब्ध नाही. या भागात परिणामकारक मेडिसिन म्हणजे रेमडेसिव्हीर आणि टोसीलिजूमाब यांचं प्रमाणही कमी आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 2, 2020, 7:18 PM IST

ताज्या बातम्या