मलायकाने अर्जुनच्या फोटोवर म्हटलं, ‘So Cute’, लोकांनी केलं असं रिअॅक्ट

मलायकाने अर्जुनच्या फोटोवर म्हटलं, ‘So Cute’, लोकांनी केलं असं रिअॅक्ट

मलायकाची ही कमेंट येताच सगळ्यांचं लक्ष अर्जुनच्या फोटोवरून हटून तिच्या कमेंटवरच गेलं. तिच्या कमेंटला लाइक्स यायला सुरुवात झाली.

  • Share this:

मुंबई, १२ फेब्रुवारी २०१९- सोशल मीडियाच्या या जमान्यात सेलिब्रिटींनी आपलं प्रेम कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्यात फारसं यश मिळत नाही. आता मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचंच पाहा ना...

अजूनपर्यंत मलायक आणि अर्जुनने अधिकृतरित्या त्यांच्या प्रेमाची कबूली दिलेली नाही. मात्र सोशल मीडियावरून दोघांबद्दल दरदिवशी काही ना काही कळून येतं. नुकताच अर्जुनने त्याच्य इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचा लहानपणीचा फोटो शेअर केला. अर्जुनच्या या लहानपणीच्या फोटोला अनेकांनी लाइक केलम आणि शेअरही केलं. या फोटोवर चक्क मलायकानेही आपली प्रतिक्रिया दिली.


मलायकाने अर्जुनच्या या फोटोवर 'हाहाहाहा... टू क्यूट' अशी कमेंट केली. मलायकाची ही कमेंट येताच सगळ्यांचं लक्ष अर्जुनच्या फोटोवरून हटून तिच्या कमेंटवरच गेलं. तिच्या कमेंटला लाइक्स यायला सुरुवात झाली.

मलायकाच्या कमेंटला १९ तासात २८३ लोकांनी लाइक केलं आणि त्याचे स्क्रिन शॉट सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागला.

Loading...


बॉलिवूडच्या सेलिब्रेटींच्या चाहत्यांना अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातूनच स्टार्सच्या अफेअरचा अंदाज येतो. मलायका आणि अर्जुनच्याबाबतीतही काहीसं असंच झालं. अनेकदा हे दोघं डिनर डेटला जाताना दिसतात शिवाय अनेक कार्यक्रमांमध्येही दोघं एकत्रच असतात. यावर्षी मलायका आणि अर्जुन लग्नाचा विचार करत असल्याच्या चर्चादेखील सुरू झाल्या आहेत. मात्र या चर्चेत किती तथ्य आहे हे तर फक्त ही दोघंच सांगू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 11:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...