लग्नाच्या चर्चेत मलायका अरोराचे मालदिवचे फोटो व्हायरल, लोकांनी केल्या अश्लिल कमेंट

एवढं करून ट्रोलर्स थांबले नाहीत तर या फोटोवर अर्जुन कपूरला टॅग करून त्यालाही ट्रोल करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला.

News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2019 06:24 PM IST

लग्नाच्या चर्चेत मलायका अरोराचे मालदिवचे फोटो व्हायरल, लोकांनी केल्या अश्लिल कमेंट

मुंबई, ३१ मार्च- आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोरा सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. एकीकडे मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाच्या चर्चा समोर येत आहेत तर दुसरीकडे मलायकाचा बोल्ड अवतार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

४४ वर्षीय मलायकाने बिकिनीतले एकाहून एक मादक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. काहींना तिचे हे फोटो आवडले तर काहींना मलायकाचे बिकीनीतले फोटो अजिबातच आवडले नाहीत. अनेकांनी तिच्या या फोटोंवर अश्लिल कमेंटही केल्या. असं असलं तरी मलायका अशा ट्रोलकडे फारसं लक्ष देत नाही.


मलायकाने मालदीवमधील सुट्ट्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्ये ती बिकीनीमध्ये दिसत आहे. हवा आल्याने बिकिनीवर घातलेलं पांढरं जॅकेट हवेत उडाल्याचा फोटो मलायकाने अपलोड केला. नेमकी हाच फोटो लोकांना पचनी पडत नाहीये. मग काय मलायकाला ट्रोल करणारी एक फौज सौशल मीडियावर कामाला लागली.


Loading...

मलायकाच्या या सेक्सी पोजवर एकाने कमेंट करत तिला तिच्या वयाची आठवण करून दिली. तर एकाने थोडी लाज बाळगण्याचा सल्ला दिला. एवढं करून ट्रोलर्स थांबले नाहीत तर या फोटोवर अर्जुन कपूरला टॅग करून त्यालाही ट्रोल करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला.


मलायका आणि अर्जुन एप्रिल महिन्यात लग्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण अजूनपर्यंत दोघांनीही याबद्दल अधिकृत माहिती दिली नाही. दोघांनी अजून त्यांच्या प्रेमाचीही कबूली दिलेली नाही. त्यामुळे एप्रिल महिन्यात दोघं लग्न करणार की नाही याबद्दल प्रश्न चिन्हच आहे.

मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2019 06:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...