News18 Lokmat

वयातील अंतरावरून ट्रोलिंग करणाऱ्यांवर भडकली मलायका अरोरा, म्हणाली...

Malaika Arora | Arjun Kapoor | नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वयातील अंतरावरुन ट्रोल करणाऱ्यांना मलायकानं जशास तसं उत्तर दिलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 30, 2019 06:05 PM IST

वयातील अंतरावरून ट्रोलिंग करणाऱ्यांवर भडकली मलायका अरोरा, म्हणाली...

मुंबई, 30 जून : अभिनेत्री मलायका अरोरा सध्या बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत न्यूयॉर्कमध्ये सुट्टी एंजॉय करत आहे. अर्जुनच्या वाढदिवसाला सोशल मीडिया अर्जुनचा फोटो पोस्ट करत मलायकानं प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर अर्जुनच्या फॅमिलीसोबतचे मलायकाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण अर्जुन आणि मलायकाला नेहमीच त्यांच्या वयातील अंतरामुळे ट्रोल केलं जातं. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यावर प्रतिक्रिया देत मलायकानं या सर्व ट्रोलर्स जशास तसं उत्तर दिलं आहे.

मलायका-कतरिना सोडा, 'या' मराठी अभिनेत्रीच्या मालदीव व्हेकेशनचे फोटो पाहिले का?

मलायकानं हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखातीत घटस्फोटानंतर पुन्हा एकदा रिलेशिपच्या प्रश्नावर उत्तर देताना ती या रिलेशनशिपबाबत मोकळेपणानं बोलली. ती म्हणाली, ‘हे खरचं अद्भुत आहे. जेव्हा माझा घटस्फोट झाला त्यावेळी मी दुसऱ्या रिलेशनचा विचार केला नव्हता. मला पुन्हा एका तुटण्याची भीती वाटत होती. पण मला एक नातं हवं होत आणि ते मला मिळालं. मी त्याबाबत खूप खुश आहे.’ पण अर्जुन आणि तिच्या वायातील अंतरावरुन त्यांना ट्रोल केलं जात असल्याच्या प्रश्नावर मलायका म्हणाली, ‘जेव्हा तुम्ही एखाद्या नात्यात असता तेव्हा तुम्हच्यासाठी वय महत्त्वाचं नसतं. यात दोन मनं एकत्र येतात.’

पत्नीसोबत असतानाही एक्स गर्लफ्रेंडसोबत फोटो काढण्यात युवराज सिंग दंग

Loading...

मलायका पुढे म्हणाली, ‘हे माझं दुर्भाग्य आहे की आम्ही अशा समाजात राहतो, जो वेळासोबत बदलू इच्छित नाही. जर मुलीचं वय मुलापेक्षा कमी असेल तर त्यांचं नातं लोकांना मान्य असतं मात्र तेच जर मुलाच्या बाबत घडलं आणि मुलगी मोठी असेल तर मात्र तिला म्हातारी किंवा असह्य समजलं जातं. अशा लोकांना मी एकच सांगेन तुम्हाला माझ्या बद्दल असं वाटत असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. माझा नाही.’

19 हजारांमधून झाली होती निवड, आता Zaira Wasim ला झालंय तरी काय?

 

View this post on Instagram

 

#pride #onlylove #pride🌈 #pridenyc

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मलायका आणि अर्जुन यांच्यात जवळपास 11 वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे त्यांच्या सोशल मीडियावर पोस्टवर त्यांना नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागतो. मात्र मलायका आणि अर्जुननं कधीच प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता मात्र मलायाकानं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत आपलं मत व्यक्त केलं आहे.

======================================================================

VIDEO: कंडक्टर मुलीला आंटी म्हणाला आणि बसमध्ये झाला राडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2019 06:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...