VIDEO- ‘एकच कानशिलात लगावेन...’ मलायका अरोराने ‘आयटम’ म्हणणाऱ्यांना दिलं असं सडेतोड उत्तर

मलायका अरोरा आणि फिटनेस याजणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ती अनेकदा जीममधून किंवा योग करून येताना दिसते.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 06:53 PM IST

VIDEO- ‘एकच कानशिलात लगावेन...’ मलायका अरोराने ‘आयटम’ म्हणणाऱ्यांना दिलं असं सडेतोड उत्तर

मुंबई, 1 मे- बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेल्या अभिनेत्रींपाकी एक अशी मलायका अरोराची ओळख आहे. दरदिवशी तिच्याबद्दल कुठेना कुठे लिहीले जाते किंवा बोलले जाते. असा एकही दिवस नसेल जेव्हा बी- टाऊनमध्ये तिच्या नावाची चर्चा झाली नसेल.

पाणी फाउंडेशनसाठी जेव्हा 'हे' मराठी स्टार्स वाहतात घाम

काही दिवसांपूर्वी मलायकाने स्वतःहूनच सांगितले होते की तिला अभिनय करता येत नाही. मात्र तिच्यासारखं डान्स फार क्वचितच कोणी करू शकेल. मलायका ज्या सिनेमात डान्स करते ते गाणं हिट होतंच असाच काहीसा तिचा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळेच दिल से सिनेमातील छय्या छय्या गाण्यापासून ते मुन्नी बदनाम हुईपर्यंत तिच्या गाण्याची क्रेझ संपलेली नाही. तिच्या या गाण्यांना ‘आयटम नंबर’ असंही म्हटलं जातं. नेमकी हीच गोष्ट तिला मान्य नाही. मलायकाला ‘आयटम’ हा शब्द आवडत नाही.

जेव्हा 'हे' स्टार कपल दुष्काळग्रस्त गावातील ढाब्यावर भेळ आणि उसाचा रस पिताना

मलायकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट म्हटलं की, ‘मी कोणत्याही गाण्यावर नाचते ते माझ्या मर्जीने नाचते. आतापर्यंत कधीच कोणी मला जबरदस्ती केली नाही. मी गाणी निवडताना नेहमीच कम्फर्टेबल असते. जर या सगळ्यात मला काही आक्षेपार्ह वाटलं तर मी त्याबद्दल बोलते. मला स्वतःची अशी मतं आहेत. मी मुर्ख नाही.'

Loading...

'मला नेहमीच ‘आयटम साँग’ हा शब्द आवडला नाही. एकदा विचार करून पाहा की कोणी समोर चालत येत असेल आणि तो माझ्याकडे पाहून म्हणाला, ‘काय आयटम आहे ही.. ’ मी तर त्याच्या कानशिलातच लगावेन. यामुळेच मला हा शब्द आवडत नाही.’

सोशल मीडियावर आलिया भटच्या स्टायलिश बॅगची चर्चा, किंमत ऐकून व्हाल थक्क


मलायका अरोरा आणि फिटनेस याजणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ती अनेकदा जीममधून किंवा योग करून येताना दिसते. फिटनेससोबतच तिच्या स्टाइल आणि फॅशनचीही झगमगत्या दुनियेत चर्चा होत असते. याशिवाय ती तिचं इन्स्टाग्राम अकाउंट स्वतःच हँडल करते. यासाठी तिने कोणतीही टीम ठेवलेली नाही. यामुळे तिचे चाहते सहज तिच्याशी जोडले जातात. तसेच ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

'तारक मेहता का उल्टा चश्मा'त नवीन ट्विस्ट, मालिकेत परत येऊ शकते दिशा वकानी

VIDEO : जेव्हा अमेरिकन झाले 'आर्ची' आणि 'माऊली', महाराष्ट्र दिनाच्या अशाही शुभेच्छा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 06:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...