कोरोना संकट! मलायका अरोराची बिल्डिंग सील

कोरोना संकट! मलायका अरोराची बिल्डिंग सील

बॉलिवूडमधील अदाकार मलायका अरोरा राहात असलेली इमारत बुधवारी महानगरपालिकेकडून सील करण्यात आली.

  • Share this:

मुंबई, 11 जून : कोरोना व्हायरसनं अत्यावश्यक सेवांनंतर आता बॉलिवूडमधील कलाकरांच्या घरात घुसण्यास सुरुवात केली आहे. बॉलिवूडमधील अदाकार मलायका अरोरा राहात असलेली इमारत बुधवारी महानगरपालिकेकडून सील करण्यात आली. या इमारतीमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळल्यानं महानगरपालिकेकडून इमारत सील करण्यात आली आहे.

मुंबईच्या वांद्रे परिसरात मलायका अरोराच्या इमारतीत राहणारी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले, त्यानंतर 8 जून रोजी इमारत सील केल्याची माहिती मिळाली आहे. हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

View this post on Instagram

Centre of our universe #Casper #part2 @iamarhaankhan #stayhomestaysafe

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

हे वाचा-जुलै महिन्यात येणार ‘COVID-19’वर औषध? Johnson & Johnson करणार माणसांवर प्रयोग

मलायका आरोर लॉकडाऊनदरम्यान सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळालं. या इमारतीमध्ये मलायकाचा मुलगा आणि कुत्रा असे दोघंही राहात आहेत. मलायकानं लॉकडाऊनमध्ये स्वत:ला होमक्वारंटाइन केलं होतं. तिने लॉकडाऊनदरम्यान घरात सुरू असलेल्या अॅक्टिव्हिटी आणि तिचे सुंदर फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले होते.

कोरोना रुग्णांच्या संख्येने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. राज्यात बुधवारी तब्बल 3254 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत आत्तापर्यंतचे सर्वात जास्त मृत्यू झालेत. मुंबईत बुधवारी तब्बल 97 जणांचा कोरोनामुळे प्राण गेला. तर राज्यात 149 जणांचा मृत्यू झाला. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 94041 वर गेली आहे.

हे वाचा-कोण आहे कपिल देव यांची मुलगी अमिया? वडिलांच्या बायोपिकमधून करतेय बॉलिवूड पदार्पण

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 11, 2020, 7:47 AM IST

ताज्या बातम्या