मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /मालाड इमारत दुर्घटना: आजच्या मृत्यूला कोण जबाबदार?, भाजपचा सवाल

मालाड इमारत दुर्घटना: आजच्या मृत्यूला कोण जबाबदार?, भाजपचा सवाल

Malad Building Collapsed: भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि खासदार गोपाळ शेट्टी यांनी मालाडच्या मालवणी इमारत दुर्घटनेनंतर या घटनास्थळाची पाहणी केली आहे.

मुंबई, 10 जून: मुंबई, 10 जून: मुंबईत बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर ( Heavy rain in Mumbai) मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका चार मजली चाळीचा (Residential structures) काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मालाडच्या मालवणी भागात ही घटना घडली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. (Malad Building Collapsed)भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि खासदार गोपाळ शेट्टी यांनी मालाडच्या मालवणी इमारत दुर्घटनेनंतर या घटनास्थळाची पाहणी केली आहे.

घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आलेल्या दरेकरांनी पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. ही जागा जिल्ह्याधिकारी अखत्यारीतील असून येथे अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणावर असल्याचं दरेकरांनी म्हटलं आहे. अनधिकृत बांधकामाविषयी खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्रव्यवहार करून देखील कोणतीही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचं प्रवीण दरेकर म्हणालेत.

हेही वाचा- मेहुल चोक्सीला डोमिनिका सरकारकडून मोठा झटका

मी अधिवेशनात या विषयी आवाज उठवणार असल्याचंही प्रवीण दरेकरांनी सांगितलं. येथे पालिका अधिकारी आणि इतर लोकांमध्ये साटंलोटं आहे. आर्थिक व्यवहार असल्यामुळे या अनधिकृत बांधकामांना अभय मिळत असल्याची टीका दरेकरांनी केली आहे. तर आज दुर्घटनेत झालेल्या मृत्यूंना कोण जबाबदार आहे, असा सवालही दरेकरांनी उपस्थित केला आहे.

First published:
top videos

    Tags: Mumbai, Mumbai muncipal corporation, Pravin darekar