असा मेकअप कराल, तर खऱ्या वयापेक्षा 10 वर्षांनी लहान दिसाल

असा मेकअप कराल, तर खऱ्या वयापेक्षा 10 वर्षांनी लहान दिसाल

या मेकअप टीप्स फॉलो करून तुमचं वय कमी दिसेल, शिवाय कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्ही तयार व्हाल.

  • Share this:

मेकअप हल्ली प्रत्येक महिलेचा दैनंदिन जीवनातील भाग झाला आहे. फक्त पार्टी, लग्न समारंभच नव्हे, तर ऑफिस, कॉलेजमध्ये जातानाही लाईट मेकअप केला जातो. मेकअपमुळे तुम्ही सुंदर तर दिसताच मात्र जर योग्य पद्धतीने मेकअप केला तर तुमच्या खऱ्या वयापेक्षाही तुमचं वय कमी दिसेल.

डोळ्यांपासून सुरुवात करा

सुंदर चेहऱ्यात सर्वात महत्त्वाचे आहेत, ते डोळे. आपले डोळे खूप काही बोलतात. त्यामुळे डोळ्यांपासूनच मेकअपची सुरुवात करा. वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर फाइनलाइन्स, रिंकल्स येतात, जे सामान्य मेकअपने लपत नाहीत. त्यामुळे तुम्ही चाळीशी पार असाल तर विंग्ड आय मेकअप करा.

मेकअपला परफेक्ट बनवेल हायलाइटर

चेहरा तरुण दिसावा म्हणून महिला फाऊंडेशनचा वापर करतात, मात्र हायलायटरकडे दुर्लक्ष करतात. हायलाइटर मेकअपला परफेक्ट बनवण्याचा स्मार्ट मार्ग आहे. मेकअपला परफेक्ट लूक देण्यासाठी ब्रो बोन, नाक, जॉ लाइन आणि चिकबोनवर हायलायटर्स लावा.

आयब्रोजला द्या हटके लूट

तरुण मुलींमध्ये सध्या स्ट्रेट आणि डार्क आयब्रोजचा ट्रेंड आहे. काही महिलांना वाटतं स्ट्रेट आणि डार्क आयब्रोज फक्त मुलीच ठेवू शकतात. तुम्हीदेखील असाच विचार करता, तर आता करू नका. डार्क आयब्रोजने तुम्हीदेखील तुम्हाला एक नवा लूक देऊ शकता आणि तरुण दिसू शकता.

सूचना- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

अन्य बातम्या

तरुण दिसण्यासाठी नाही कोणत्याही सौंदर्यप्रसाधनांची गरज, फक्त खा 'हे' पदार्थ

आता डाय, मेहंदीशिवाय घरबसल्या काही मिनिटात काळे करा केस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2020 09:15 PM IST

ताज्या बातम्या