घरून काम करणे व घरकाम ताणरहित करू शकणारी उपकरणे

घरून काम करणे व घरकाम ताणरहित करू शकणारी उपकरणे

घरगुती उपकरणे दीर्घकाळपर्यंत तुमची दैनंदिन कामे सोपी करू शकतात.

  • Share this:

मुंबई, 28 जून : या वैश्विक महामारीच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच घरून काम करण्याचा एक नवीन पायंडा पडला आहे. ऑफिसचे कामकाज, घरकाम व कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचा समतोल साधणे हा दैनंदिन आव्हानाचा विषय बनला आहे. किंबहुना स्वयंपाकामध्ये कोणता पदार्थ झटपट आणि कमीत कमी श्रमांमध्ये बनेल याचा विचार करून केला जातो आहे.

भांडी घासण्यापासून ते फरशी पुसण्यापर्यंत सर्वच कामे तुमच्या खांद्यावर पडली आहेत. कितीही प्रयत्न केला तरीही ही कामे कदाचित तुमच्या कामकाजाच्या वेळेवरही अतिक्रमण करत असतील. आता तुम्ही यातून कसा मार्ग काढू शकता? तर, अशा घरगुती उपकरणे दीर्घकाळपर्यंत तुमची दैनंदिन कामे सोपी करू शकतात.

1.रोबोट व्हॅक्युम क्लीनर्स

तुमच्या घराची झाडलोट करताना ओबडधोबड आकाराच्या हँडल्सचे व्हॅक्यूम क्लीनर्स वापरणे विसरून जा, जे ओढणे, ढकलणे, खोलणे व पकडून राहणे गरजेचे होते. आजकाल उपलब्ध झालेले रोबोट व्हॅक्यूम क्लीनर्स हे टाईल्स, कार्पेट पसरलेल्या आणि लाकडी पृष्ठभागाच्या सफाईसाठी उपयुक्त आहेत. त्यांमध्ये इतरांच्या तुलनेमध्ये नॅविगेशन सेन्सर, वॉटर टँक, इन्फ्रारेड इंडक्शन, आणि कचरा शोधण्याचे तंत्रज्ञान ही स्मार्ट फीचर्स असतात. काही रोबोट व्हॅक्यूम्स हे मोबाईल अॅप किंवा व्हॉइस कमांड्सद्वारे नियंत्रित करता येतात. हे छोटे रोबोट्स तुम्हाला घर स्वच्छ व लखलखीत ठेवण्यासाठी मदत करू शकतात.

त्यांच्या क्षमतेचा विचार करता ते थोडेसे महागडे असू शकतात. पण क्रोमामध्ये तुमच्या डेबिट किंवा क्रेडीट कार्डच्या सहाय्याने खरेदी करताना HDFC Bank समर ट्रीट्सच्या मदतीने तुम्ही कॅशबॅक किंवा इझी इएमआय मिळवू शकता.

2. Dishwashers डीशवॉशर

वेगवेगळे पदार्थ बनवण्यामध्ये आनंद मिळतो खरा, पण त्यानंतर सिंकमध्ये साचलेला भांड्यांचा ढीग मात्र डोकेदुखी बनू शकतो. आणि जर तुम्ही एखाद्या मोठ्या कुटुंबात राहत

असाल तर दिवसातून तीनदा भांडी घासणे हे केवळ कष्टप्रदच नाही तर वेळखाऊ काम बनते. अशावेळी डिशवॉशर तुम्हाला उपयोगी पडू शकतो. सध्याचे डिशवॉशर्स हे पाणी व वीज वाचवण्यासाठी सक्षम असतात, तर काही धुलाईच्या सेटसाठी स्मार्ट डीव्हाईसशी सिंक करतात येतात. त्यामुळे हे तुमच्यासाठी व पाणी वीज यांच्या बचतीसाठी उपयुक्त ठरतात.

3.एचडी स्मार्ट टीव्ही व होम थिएटर सिस्टीम

घरात थांबणे ही एक जबाबदारी व एक प्रकारची सावधगिरी आहे आणि परिणामी दुर्दैवाने मनोरंजनाच्या साधनांना मर्यादा येतात. तर चांगली गोष्ट ही आहे की स्मार्ट एचडी टीव्हीच्या मदतीने तुम्ही मनोरंजनाला चालना देऊ शकता. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रत्येक प्रकारच्या ग्राहकासाठी फिल्म्स, टीव्हीवरील कार्यक्रम आणि माहितीपट यांचा खजिना उपलब्ध आहे, तसेच होम थिएटर हे सिनेमा हॉलचा अनुभव देऊ शकते.

4. स्मार्ट कन्व्हर्टीबल रेफ्रिजरेटर्स

जर तुम्हाला आठवड्याच्या अखेरीस पदार्थ बनवून पुढील आठवड्यासाठी साठवून ठेवायचे असतील किंवा सतत बाहेर पडणे टाळण्यासाठी खूप साऱ्या वस्तू घरात साठवायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला प्रशस्त रेफ्रिजरेटरची आवश्यकता आहे. आणि नवीन 5-इन-1 स्मार्ट कन्व्हर्टीबल रेफ्रिजरेटर्स याचसाठी बनलेले आहेत. त्यातूनही यांच्या आकारमानापेक्षाही ते जलद फ्रीझिंग करतात, त्यांमध्ये भाज्या टवटवीत ठेवण्यासाठी विविध कूलिंग मोड असतात तसेच ते दुर्गंधीही नियंत्रित करतात.

यासाठी तुम्हाला तुमच्या खिश्यावर पडणाऱ्या ताणाचीही चिंता करण्याची गरज नाही. HDFC Bank समर ट्रीट्सद्वारे Samsung व LG इलेक्ट्रिकल्सच्या दुकानातून केलेल्या खरेदीवर तुम्ही

कॅशबॅक व नो कॉस्ट इएमआयचा पर्याय मिळवू शकता.

या नवीन घरून काम करण्याच्या कल्चरमध्ये तुम्हाला दररोज ऑफिसचे कामकाज व घरातील जबाबदाऱ्या यांचा समतोल साधावा लागतो. आणि अचूक उपकरणेच तुम्हाला चतुराईने एकाच वेळी अनेक कामे चांगल्या रीतीने करण्यास मदत करतात, आणि घरी राहूनच तुम्हाला अधिक व्यावसायिक बनण्यास मदत करतात.

ब्ल्यूटूथ हेडसेट्स: एखादे चांगले नॉईस-कॅन्सलिंग ब्ल्यूटूथ हेडसेट्स तुम्हाला कॉल्स घेणे, गोंगाट व कुजबूज टाळून किंवा घरातील छोटी छोटी कामे करताना कॉन्फरन्स मिटींग्स ऐकण्यासाठी उपयोगी पडतात.

लॅपटॉप: जर तुम्ही तुमच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम करणाऱ्या तुमच्या मंदगती लॅपटॉपमुळे त्रासलेले असाल तर तुम्हाला अशा नवीन लॅपटॉपची गरज आहे जो कोणत्याही अडथळ्याशिवाय एकाच वेळी अनेक कामे करण्यासाठी सक्षम असेल. एखादा हाय रिझोल्युशन व फस्त प्रोसेसर तुम्हाला उत्तम युझर एक्स्पेरीअन्स देऊ शकतो, जो तुम्ही कामासाठी व खेळण्यासाठी वापरू शकता. एखाद्या चांगली बॅटरी असलेल्या कम्प्युटरचा शोध घ्या जेणेकरून तुम्ही वीजपुरवठा खंडित झाल्याने येणाऱ्या अडथळ्याशिवाय काम करू शकाल. कोरोनाच्या संकटाशी जग झुंजत असताना तुमच्या घरातील तणाव दूर करण्यासाठी आवश्यक ते सर्व करा आणि तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. या सक्षम उपकरणांवर अंगमेहनतीच्या कामांचा भार सोपवून तुमच्या सुरक्षेला प्राधान्य द्या. तुमची खरेदी सुलभ करण्यासाठी HDFC Bank समर ट्रीट्स ला भेट द्या. आकर्षक कॅशबॅक ऑफर्स, नो कॉस्ट इएमआयज यांसह तुम्ही या नवीन सामान्य परिस्थितीमध्ये आवश्यक अशा सर्व गोष्टी मिळवून सुरक्षित राहू शकाल.

First published: June 28, 2020, 3:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading