News18 Lokmat

करा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश

एक्सपर्ट्स सांगतात की, पालकांनी एक लहानशा गुंतवणुकीचं नियोजन केलं तर करियर सुरू करण्याच्या वयातच तुमच्या मुलाच्या हातात कोट्यवधी रुपये राहतील. हा पैसा त्याला त्यांच करियर बनविण्यासाठी लाभदायक ठरेल. मग प्रश्न असा उद्भवतो की, हे कसं शक्य आहे? जाणून घेऊया यासंदर्भातली माहिती...

News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2018 11:10 PM IST

करा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश

आपल्या मुलांच भविष्य उज्ज्वल कसं होईल याची चिंता प्रत्येक माय-बापाला असते. शिक्षण महाग झालं असल्यामुळे पालकांचीसुद्धा आर्थिक कुचंबणा होते. पण पालकांनी जर एक लहाशा गुंतवणुकीचं नियोजन केलं तर करियर सुरू करण्याच्या वयातच त्यांच्या पाल्याच्या हातात 1 कोटी रुपये राहतील. त्यासाठी पालकांनी दर महिन्यात किमान 1400 रुपये गुंतवावे असं अर्थतज्ञ सांगतात. या पैशातून त्यांच्या मुलाला निश्चितच उत्तम करियर करता येईल. हे तेव्हाच शक्य होऊ शकतं, जेव्हा पालक आर्थिक नियोजन करतील. कसं कराल हे नियोजन? जाणून घेऊया..

कुठे कराल गुंतवणूक - एक्सपर्ट्स सांगतात की दिर्घ काळासाठी गुंतवणूक केली तर त्याचे निश्चितच चांगले रिटर्न (परतावा) मिळतात. आणि ते रिटर्नस म्‍युचुअल फंडाद्वारे सहज मिळू शकतात. असे अनेक म्‍युचुअल फंड आहेत, ज्यात गेल्या वर्षभरात 50 टक्क्यांहून अधीक रिटर्न दिलेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी 12 टक्क्यांहून अधिक रिटर्नस् दिले आहेत. जर अशा म्‍युचुअल फंडमध्ये गुंतवणूक केली तर सहजरित्या 12 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न मिळू शकतात.

असा वाढेल पैसा - लहानशी गुंतवणूक कोट्यावधींमध्ये कशिकाय बदलू शकते असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात निर्माण झाला असेल. त्यावर आर्थतज्ञ सांगतात की, अशा गुंतवणुकीत सुरूवातीला कमी रिटर्न मिळतात, पण एक वेळ अशी येते की त्या गुंतवणुकीतून जास्त रिटर्नस मिळायला लागतात. याठिकाणी पैसाच पैशाला वाढवतो. या मध्यमातून गुंतवणुक केल्यास पाचव्या वर्षापासून 1.5 लाखाहून अधीक फंड त्यात जमा होईल. तर 10 व्या वर्षात 5 लाखाहून अधिक फंड जमा होईल. 15 व्या वर्षात 16 लाखांवर, 20 व्या वर्षात 42 लाखांवर आणि 25 वर्षानंतर 1 कोटी रुपयांहून अधीक फंड त्यात जमा होईल.

Loading...

कर लागेल का? - इनकम टॅक्‍स सल्लागार सांगतात की, इक्विटी म्‍युचुअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना लॉगटर्म कॅपिटल गेन टॅक्‍सचा फायदा मिळतो. या फंडात केलेली गुंतवणूक वर्षभरात पूर्णतः टॅक्स फ्री होऊन जाते. लाभ कितिही होवो, त्यावर तुम्हाला कोणताच द्यावा लागणार नाही, असा सल्ला गुंतवणूक सल्लागार, ब्रोकरेज हाउस आणि मार्केट एक्सपर्ट्सद्वारा देण्यात आलाय. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या स्तरावर एखाद्या जाणकाराचा सल्ला जरूर घ्या. कारण जितकी गुंतवणूक अधीक तितकी जोखीम जास्त हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 15, 2018 11:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...