7.70 लाखांची मेक इन इंडिया Honda CBR650R बाइक लाँच, 'ही' आहेत फीचर्स

7.70 लाखांची मेक इन इंडिया Honda CBR650R बाइक लाँच, 'ही' आहेत फीचर्स

ग्रँड प्रिक्स रेड आणि मॅट गनपावडर ब्लॅक अशा दोन रंगात ही स्पोर्ट्स बाइक उपलब्ध.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मे : हाँडा मोटरसायकल अॅन्ड स्कुटर इंडिया (HMSI) ने आपली नवी मिडलवेट स्पोर्टबाइक Honda CBR650R ची डिलीवरी सुरू केली आहे. गुरूग्राम येथील Honda BigWing या शोरूममध्ये याचा शुभारंभ झाला. भारतात या बाइकची एक्स-शोरूम किंमत 7.70 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. हाँडाने याआधी लाँच केलेल्या CBR650F या बाइचं हे लेटेस्ट आणि पावरफुल व्हर्जन असून, ग्रँड प्रिक्स रेड आणि मॅट गनपावडर ब्लॅक अशा दोन रंगात ही स्पोर्ट्स बाइक उपलब्ध असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

पहिल्यांदाच धावणार ड्रायव्हरलेस ट्रक; 'ही' आहेत फीचर्स

इंजिन - हाँडाच्या या स्पोर्ट्स बाइकमध्ये चार सिलेंडरचं 649सीसी इंजिन बसवण्यात आलं असून ते लिक्विड कुलिंगसह आहे. 649सीसीचं हे इंजिन 12,000rpm सह 94bhp ची पावर जेनरेट करतं आणि 64Nm का पीक टॉर्क देतं.

आता तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स होणार स्मार्ट, 'हे' होतील फायदे

फीचर्स - Honda CBR650R या स्पोर्ट्स बाइकमध्ये एक स्लिपर क्लच आणि हाँडाचं स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम आहे. हाँडाच्याच CBR650F या बाइकच्या तुलनेत या बाइकचं वजन 6 किलोग्रामने कमी आहे. 310 mm चे ट्विन फ्रंट डिस्क ब्रेक्स आणि 240 mm चा एक सिंगल रियर डिस्क ब्रेक या बाइकमध्ये देण्यात आले आहेत. तसंच स्टँडर्ड ड्युएल चॅनल ABS देण्यात आलं आहे.

First published: May 18, 2019, 3:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading