जळगावात प्लास्टिक कंपनीला भीषण आग, लाखोंचा माल जळून खाक

जळगावात प्लास्टिक कंपनीला भीषण आग, लाखोंचा माल जळून खाक

एमआयडीसी परिसरात प्लास्टिक कंपनीला भीषण आग

  • Share this:

राजेश भागवत,(प्रतिनिधी)

जळगाव,26 ऑक्टोबर: एमआयडीसी परिसरात प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे 4 बंब पोहोचले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसीतील ई सेक्टर मधील आशीर्वाद प्लास्टिक कंपनीला शनिवारी सकाळी 8 वाजता शार्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे. 4 अग्निशमन बंबाच्या मदतीने ही विझवण्यात आली आहे.मात्र, या आगीमुळे कंपनीतील प्लास्टिक समान जळून खाक झाला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच महानगरपालिका आणि जैन इरिगेशनाचे 4 अग्निशमन बंब मागवण्यात आले. एमआयडीसी पोलिसातील कर्मचारी व बीट मार्शल यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी मदत केली.

दुचाकीस्वार ठार, जमावाने पेटवले वाहन

दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील भुसावळ जवळील खडका चौफुलीजवळ बालाजी टोल नाक्याजवळ पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हर्षल गणेश कोळी (20) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर जमावाने पिकअपसह एका अन्य वाहनाची जाळपोळ केली. पालिकेचा अग्निशमन बंब उशिरा पोहोचल्याने दोन्ही वाहनांची राखरांगोळी झाली. हर्षल व शुभम लोहार हे दोघे वरणगावकडून भुसावळकडे दुचाकीने येत होते. या वेळी पिकअपने दुचाकीला धडक दिली. हर्षलचा जागेवरच मृत्यू झाला.

क्यार वादळामुळे सिंधुदुर्गात मोठं नुकसान, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 11:35 AM IST

ताज्या बातम्या